विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : कर्नाटकातील शिवमोग्गा येथे बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षाची हत्या करण्यात आली. हषार्ची हत्या करणाऱ्याला१० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, असा धक्कादायक आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी हषार्ने बजरंग दल सोडल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्याला धमक्या येत होत्या आणि पोलिसात तक्रार दिली होती. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.A reward of Rs 10 lakh was announced for the murder of a Bajrang Dal activist
रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हर्षची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. तो २६ वर्षांचा होता. हर्षाच्या अंत्ययात्रेत सोमवारी हिंसाचारही झाला. अंत्ययात्रेनंतर सर्वत्र शांतता आहे, अशी माहिती शिवमोगाचे पोलीस अधीक्षक लक्ष्मी प्रसाद बीएम म्हणाले. या प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी दोन जणांच्या अटकेची शक्यता आहे. पोलिसांनी त्यांची ओळख आणि हत्येचं कारणही उघड केलेलं नाही.
अंत्ययात्रेत झालेल्या हिंसाचाराच्या वेळी निदर्शने करणाºयांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना अनेक ठिकाणी अश्रुधुराचा वापर करावा लागला. सुरक्षेच्या दृष्टीने शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शिवमोगा येथील शाळा आणि महाविद्यालये दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहेत.
‘हषार्ची हत्या मुस्लिम गुंडांनी केली होती. काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी हत्येसाठी प्रवृत्त केले होते’, असा आरोप राज्यमंत्री के. एस .ईश्वरप्पा यांनी केला आहे. या आरोपाला काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी उत्तर दिले आहे. ‘भाजप धर्माच्या नावावर दंगली घडवत आहे. ईश्वरप्पा यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवकुमार यांनी केली. तर ‘हिजाबविरोधी आंदोलनामुळे हषार्ची हत्या झाली, असा दावा भाजप नेते बी. एल. संतोष यांनी केला आहे.
कर्नाटकातील होनाली येथील भाजपच्या रेणुकाचार्य यांनी हर्षाच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येची घटना कुठल्याही पाठबळाशिवाय घडू शकत नाही. आरोपी आणि हर्षात झटापटगी झाली, असे शिवमोगा जिल्ह्याचे प्रभारी मंत्री के. सी. नारायण गौडा म्हणाले.
प्राथमिक तपासात पोलीस याकडे हिजाब वादाशी जोडून पाहत आहेत. कारण हषार्ने त्याच्या फेसबुक प्रोफाइलवर हिजाबच्या विरोधात आणि भगव्या उपरणाच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिली होती. कर्नाटकातील उडुपीमध्ये हिजाबचा वाद समोर आल्यापासून बजरंग दल सक्रिय झाला आहे. त्यामुळे हर्षाच्या हत्येचा कट रचल्याचा संशय बळावला आहे. मात्र, पोलीस याबाबत काहीही बोलण्याचे टाळत आहेत.
या घटनेनंतर शिवमोग्गा येथे तणाव निर्माण झाला. आझाद नगर येथील मुस्लिमबहुल भागात सोमवारी जमाव जमला होता. दुकानांची तोडफोड करण्यात आली. बाहेर उभी असलेली वाहने जाळण्यात आली. संध्याकाळपर्यंत तणाव कायम होता. शहरातील सीगेहट्टी परिसरात जमावाने अनेक वाहनांची जाळपोळ केली. तणाव वाढत असल्याने शहरात जमावबंदी लागू करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App