
सिंगापूरचे पंतप्रधान ली सियन लूंग यांनी सिंगापूरच्या संसदेत भाषण करताना भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव घेतले. या खेरीज त्यांनी भारतातल्या लोकशाहीचे वर्णन करताना भारत असल्यास संसदेमध्ये निम्मे खासदार खून, बलात्कार असले आरोप असलेल्या व्यक्ती आहेत, अशी टीका केली आहे.Nehru’s name and Liberal boil over in the “Singapore Lecture” on democracy
या मुद्द्यावरून भारतामध्ये दोन तट पडले असून काँग्रेसच्या नेत्यांनी सिंगापूरच्या पंतप्रधानांचे भाषण उचलून धरत केंद्रातल्या मोदी सरकार वर टीकास्त्र सोडले आहे, तर मोदी सरकारने सिंगापूरच्या राजदूतांना परराष्ट्र मंत्रालयात बोलवून भारताच्या विषयी आणि विशेषत: संसद सदस्यांनी विषयी सिंगापूरच्या पंतप्रधानांनी काढलेल्या उद्गारांवर अधिकृतरित्या तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यावरुन देखील काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी मोदी सरकारला घेरले आहे.
परंतु मुद्दा त्या पलिकडचा आहे. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पंडित जवाहरलाल नेहरूंचे नाव घेतल्यानंतर भारतातल्या काँग्रेसजनांना, लिबरल आणि न्यू लिबरलना आनंदाची उकळी फुटली आहे. त्यांनी सिंगापूरच्या पंतप्रधानांच्या भाषणात “निवडक वेचक” भाग आपापल्या सोशल मीडिया हँडल वरून शेअर केला आहे.
आता सिंगापूरच्या पंतप्रधानांनी पंडित नेहरूंचे नाव घेतले हे खरे, पण त्यांनी भारतातल्या सदस्यांवर टिपण्णी करून औचित्यभंग देखील केला आहे, ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळेला फक्त “निवडक वेचक” भाग शेअर करून काँग्रेसजनांनी आपली मानसिकता दाखवून दिली आहे. जणू काही पंतप्रधान नेहरूंचे नाव परदेशातल्या पंतप्रधानांनी घेतले म्हणजे ते “पावन” झाले, असे भाव काँग्रेसजनांच्या सोशल मीडिया हँडल वरून प्रगट होताना दिसले आहेत.
Singapore PM invokes Nehru to argue how democracy should work during a parliamentary debate whereas our PM denigrates Nehru all the time inside and outside Parliament
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) February 17, 2022
सिंगापूरचे विद्यमान पंतप्रधान ली सियन लूंग हे माजी पंतप्रधान ली क्वान यू यांचे धाकटे चिरंजीव आहेत. म्हणजे एक प्रकारे स्वतःच्या घराणेशाहीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी त्यांनी आपल्या देशाच्या संसदेत लोकशाहीवर लेक्चर दिल्याचे दिसून येते आणि त्यामध्ये त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंचे नाव घेतले आहे. त्यामुळे खरे म्हणजे हुरळून जाण्याचे काहीच कारण नाही. जवाहरलाल नेहरूंचे राजकीय कर्तृत्व स्वयंसिद्ध मोठे आहे. त्यासाठी सिंगापूरच्या पंतप्रधानांच्या शिक्कामोर्तबाची गरज नाही. पण काँग्रेसजनांना हे सांगणार कोण??
शिवाय गोड गुलाबी छान भाषेत दिलेले लोकशाहीचे लेक्चर आपल्या देशातल्या लिबरलना फार आवडत असते. त्यातही सिंगापूरच्या पंतप्रधानांनी नेहरूंचे नाव घेऊन लोकशाहीला जणू “चार चांद” लावले आहेत असे लिबरलना वाटले असल्यास त्यात नवल नाही…!!
पंडित जवाहरलाल नेहरू यांचे व्यक्तिमत्व जसे मोठे होते हिमालयाच्या उंचीचे होते तशा त्यांच्या चुकाही हिमालयाच्या उंचीच्या घडल्या आहेत. त्याचे तटस्थ मूल्यमापन व्हायला हवे.
या खेरीज एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करावासा वाटतो. गोड गुलाबी छान भाषेमध्ये पूर्वेकडच्या देशांना लोकशाहीवर लेक्चर देणे हा पाश्चिमात्य देशांना आपला “विशेषाधिकार” वाटतो. पाश्चिमात्य देश स्वतःच्या देशात काय घडते यापेक्षा भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात काय घडते?, यावर अहवाल प्रकाशित करतात. मानवाधिकार किंवा तत्सम विषयावर आपण “सर्वाधिकारी” आहोत, अशा थाटात ते भाष्य करतात. पण ही सवय सिंगापूरच्या पंतप्रधानांनी उचलली आहे आणि त्यामुळेच त्यांनी लोकशाही वरची लेक्चरबाजी करताना भारताला धडा देण्याचा प्रयत्न केला आहे. या निमित्ताने राजनैतिक पातळीवर भारतीय सरकारने सिंगापूरला धडा शिकवला आहे…!!
Nehru’s name and Liberal boil over in the “Singapore Lecture” on democracy
महत्त्वाच्या बातम्या
- अरविंद केजरीवाल नव्या वादात, स्वत : ची तुलना केली शहीद भगतसिंगांची तुलना
- मेड इन चायना टेस्लाचे भारतात स्वागत नाही, नितीन गडकरी यांचा इशारा
- शशी थरुर यांचे भारतविरोधी ट्विट, म्हणे भाजपच्या सदस्यांना बंदी घालण्याची कुवेती खासदारांची मागणी, कुवेतच्या भारतीय दुतावासाकडून निषेध
- आम आदमी पार्टी वरचे आरोप गंभीर; अमित शहांनी घातले लक्ष; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र!!