प्रतिनिधी
पुणे : तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर 300 महागड्या गाड्यांच्या ताफ्यासह मिरवणूक काढणाऱ्या कुख्यात गॅंगस्टर गजानन मारणे याची पत्नी माजी नगरसेविका जयश्री मारणे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.Gangster Gajanan’s wife joins NCP in Pune
राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष, माजी महापौर प्रशांत जगताप यांनी त्यांचे स्वागत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन मी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे जयश्री मारणे यांनी नंतर पत्रकारांना सांगितले.
जयश्री मारणे या 2012 ते 2017 या कालावधीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका होत्या. मध्यंतरी मनसेच्या नेत्यांना रुपाली ठोंबरे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपल्या अनेक जुन्या सहकाऱ्यांना राष्ट्रवादीत प्रवेश घेण्यासाठी उद्युक्त केले आहे. त्यापैकी एक जयश्री मारणे आहेत.
गजानन उर्फ गजा मारणे याच्यावर पप्पू गावडे आणि अमोल पद्धत यांच्या कुणाचा आरोप आहे त्याच्यावर 2014 मध्ये दहशतवाद प्रतिबंधक कायदा मोक्का खाली कारवाई करण्यात आली आहे.
गजा मारणेने तळोजा कारागृहातून बाहेर आल्यानंतर तब्बल 300 महागड्या गाड्यांसह एक्सप्रेस वे वरून आपली मिरवणूक काढली होती. त्यावेळी त्याने महाराष्ट्राचा किंग असे स्टेटस टाकले होते. गजा मारणेच्या या मिरवणुकीची हायकोर्टाने दखल घेऊन पोलिसांना त्याच्यावर कारवाई करायला भाग पाडले. त्यानंतर त्याला येरवडा कारागृहात हलवण्यात आले. नंतर कोल्हापूर कारागृहात नेण्यात आले होते. सध्या पुन्हा त्याला तळोजा कारागृहात ठेवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App