प्रतिनिधी
पठाणकोट : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या आपल्या दुसऱ्या दौर्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा काँग्रेसवर जोरदार तोफा डागल्या. त्यांनी एका पाठोपाठ एक काँग्रेसची पापे मोजली आणि म्हणाले, 1971 च्या बांगलादेश युद्धाच्या वेळी जर केंद्रात कणखर सरकार असते तर त्याच वेळी लाहोर वर तिरंगा फडकला असता आणि गुरुनानक यांची जन्मभूमी करतारपूर साहेब भारतात समाविष्ट झाले असते…!! Speaking at a rally in Pathankot in Punjab. Watch.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पठाणकोट मध्ये भाजप आणि मित्र पक्षांच्या जाहीर सभेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारने पंजाब साठी केलेल्या विविध कामांची उजळणी केली. कृषी कायदे मागे घेण्यास संदर्भातली आठवणही करून दिली.
परंतु पंतप्रधान मोदींनी सर्वात महत्त्वाचे म्हणजे काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस सरकारांवर जोरदार हल्लाबोल केला. गुरू नानक देव यांनी रावी किनारी स्थापन केलेल्या करतारपूर साहेब संदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की 1947 साली भारताची फाळणी झाली त्यावेळी काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी आपल्या सर्वांची आस्था असलेले कर्तारपूर साहेब पाकिस्तानात जाऊ दिले. त्यावेळी थोडा कणखरपणा दाखवला असता तर करतारपूर साहेब भारतात राहिले असते. त्यानंतर 1965 च्या युद्धाच्या वेळी भारतीय सेना पश्चिम आघाडीवर लाहोरच्या वेशीवर जाऊन धडकले होत्या. परंतु त्या वेळच्या सरकारने तेही घडू दिले नाही.
https://youtu.be/07U6kJXyFkE
Speaking at a rally in Pathankot in Punjab. Watch. https://t.co/O3mIaBWvfc — Narendra Modi (@narendramodi) February 16, 2022
Speaking at a rally in Pathankot in Punjab. Watch. https://t.co/O3mIaBWvfc
— Narendra Modi (@narendramodi) February 16, 2022
आपल्या सैन्याला माघार घेणे पाकिस्तानने नव्हे, तर आपल्या सरकारने भाग पाडले. अन्यथा 1965 मध्ये लाहोर वर तिरंगा फडकला असतात आणि कर्तारपूर साहेब भारतात आले असते. 1971 च्या युद्धाच्या वेळी तिसरी संधी भारताला मिळाली होती. भारतीय सैन्याने या वेळी देखील पश्चिम आघाडीवर जोरदार मुसंडी मारली होती. बांग्लादेशच्या युद्धात 90000 अधिक पाकिस्तानी सैनिक भारतीय सैन्य पुढे शरण आले होते. ते भारताच्या कैदेत होते. त्यावेळच्या सरकारने कणखरपणा दाखवून कर्तारपूर साहेब भारताकडे सोपवा तरच पाकिस्तानचे 90000 कैदी परत करू असा इशारा जरी दिला असता तरी कर्तारपूर साहेब सारखे पवित्र ठिकाण भारतात समाविष्ट होऊ शकले असते. परंतु या तिन्ही संधीचा त्यावेळच्या काँग्रेस सरकारने आणि नेतृत्वाने घालवल्या अशी घणाघाती टीका पंतप्रधान मोदींनी केली.
त्याच वेळी आज युद्ध नसले तरी 2016 मध्ये राजनैतिक पातळीवर चर्चा करून आपण कर्तारपूर साहेब कॉरिडोर बनवला अन्यथा आपल्या देशातल्या सर्व भाविकांना दुर्बिणीतून कर्तारपूर साहेबचे दर्शन घ्यावे लागत होते, याकडे देखील पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले. पंतप्रधानांच्या या प्रखर हल्लाबोला नंतर अद्याप काँग्रेसची प्रतिक्रिया येणे बाकी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App