विशेष प्रतिनिधी
मुरादाबाद: उत्तर प्रदेशात यंदाच्या निवडणुकांत नवाच पॅटर्न उदयास येत आहे. समाजवादी पक्षाला रोखण्यासाठी बहुजन समाज पक्ष भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहे. कुंडरकी विधानसभा मतदारसंघातील बसपाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार हाजी रिझवान यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.Fwd: New pattern in Uttar Pradesh, Bahujan Samaj Party candidate appeals to vote for BJP to defeat Samajwadi Party
ते त्यांच्या समर्थकांना समाजवादी पक्षाच्या झिया-उर रहमान यांना रोखण्यासाठी भाजपच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन करताना ऐकू येत आहेत. संभलचे खासदार शफीकुर रहमान बारक यांचे झिया-उर-रेहमान नातू आहेत.समाजवादी पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर रिझवान बाहेर पडले होते.
कोणत्याही परिस्थितीत सपा उमेदवार जिंकू नये, असा प्रण त्यांनी केला आहे. त्यामुळे ते या क्लिपमध्ये म्हणत आहेत की, मी माझ्या मतदारांना आवाहन केले. मी काहीही चुकीचे बोललो नाही. मी आणखी काय म्हणावे? आम्ही यापूर्वी पाच वेळा डॉ. बारक यांना पाठिंबा दिला आहे, परंतु यावेळी ते वेगळे आह.
एक दशकाहून अधिक काळ समाजवादी पक्षात असलेले रिझवान म्हणाले, ज्येष्ठ सपा नेते राम गोपाल यादव यांनी तिकीटांचे वाटप केले होते. त्यांची रणनीती काय आहे हे मला माहीत नाही. माझे मतदार माझ्यासोबत आहेत आणि मी त्यांचा आभारी आहे. ऑडिओ क्लिप माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी लीक केली होती. मला कोणताही पश्चात्ताप नाही. समाजवादी पक्षाने पाठीत वार केला आहे. आता मी त्यांना माझी जागा घेऊ देणार नाही. ते येथून वाईटरित्या पराभूत होतील.
ऑडिओ क्लिपमध्ये, रिझवान या जागेवरील भाजपचे उमेदवार कमल प्रजापती यांचे चुलत भाऊ अजय कुमार प्रजापती यांच्याशी बोलत आहेत. ते म्हणत आहेत की जर तुमच्या लोकांनी मला मत दिले तर त्यांना तसे करू द्या, परंतु जर ते माझ्याविरुध्द मतदान करण्याचा विचार करत असतील तर त्यांचे मत सपाला जाऊ नये.
बसपाच्या उमेदवारावर टीका करताना सपा उमेदवार म्हणाले, माझे आजोबा डॉ. बारक हे रिजवानमुळे नव्हे तर मतदारसंघातील लोकांमुळे जिंकले. आता संपूर्ण राज्यात भाजपला सत्तेतून बाहेर फेकायचे असताना ते मतदारांना भाजपला पाठिंबा देण्यास सांगत आहेत. मी मला खात्री आहे की कुंडर्कीचे मतदार त्यांना त्यांच्या या लाजिरवाण्या कृत्याबद्दल धडा शिकवतील.एका स्थानिक सपा नेत्याने सांगितले की, आम्ही आता ऑडिओ क्लिप ज्या मतदारसंघात मतदान संपले नाही तेथे प्ले करू आणि बसपा आणि भाजपमधील संबंध उघड करू.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App