माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीएच्या कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने म्हणजे ईडीने छापे टाकले. सीएचे कार्यालय आणि निवास अशा १२ ठिकाणी छापे टाकून शोध घेण्यात येत आहे. ED raids Anil Deshmukh’s CA office
विशेष प्रतिनिधी
नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीएच्या कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने म्हणजे ईडीने छापे टाकले. सीएचे कार्यालय आणि निवास अशा १२ ठिकाणी छापे टाकून शोध घेण्यात येत आहे. अनिल देशमुख यांच्या श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यात ७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला होता. याप्रकरणी ही छापेमारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केलेल्या पोलिसांना 100 कोटींच्या वसूलीचे टार्गेट दिल्याच्या गंभीर आरोपांसह भ्रष्टाचार व गैरकारभाराच्या आरोपांवरुन गुन्हा दाखल करुन ईडी तपास करत आहे. यात देशमुख यांच्या गृहमंत्री असल्याच्या काळात झालेल्या पोलीस बदल्यांबाबत ईडीने देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहायकांसह गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविले आहेत. यात देशमुख यांचे विशेष कार्य अधिकारी रवी व्हटकर यांनी ईडीकडे नोंदविलेल्या जबाबाचा समावेश आहे.
व्हटकर यांनी ईडीला दिलेल्या जबाबानुसार, पोलीस आस्थापन मंडळ हे केवळ नावापूरते आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय हा आधीच घेतला जात होता. राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्यांपूर्वी देशमुख आणि परब यांच्यात सह्याद्री अतिथी गृह व ज्ञानेश्वरी बंगल्यावर गुप्त बैठक व्हायची. या बैठकीला माझ्यासह देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पालांडे हेसूद्धा उपस्थित असल्याचे व्हटकर यांनी स्पष्ट केले आहे. या माध्यमातून मिळालेला पैसा श्री साई शिक्षण संस्थेच्या मार्फत वळविण्यात आल्याचा संशय आहे. त्याच पार्श्भूमीवर ही छापेमारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App