
कर्नाटकातून सुरू झालेल्या हिजाबच्या वादावर देशातील अनेक ठिकाणी निदर्शने होत आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय खलिस्तानी दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून हिजाबच्या मुद्द्यावरून भारतात अराजकता पसरवण्याचा कट रचला जात आहे. भारतात हिजाब सार्वमतासाठी एक वेबसाइटही तयार करण्यात आली आहे. Pakistani link to hijab controversy ISI’s attempt to create chaos with the help of Sikhs for Justice, IB issues alert
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कर्नाटकातून सुरू झालेल्या हिजाबच्या वादावर देशातील अनेक ठिकाणी निदर्शने होत आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय खलिस्तानी दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून हिजाबच्या मुद्द्यावरून भारतात अराजकता पसरवण्याचा कट रचला जात आहे. भारतात हिजाब सार्वमतासाठी एक वेबसाइटही तयार करण्यात आली आहे.
एवढेच नाही तर ISI ने शीख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याच्याकडून व्हिडिओही जारी केला आहे. आयएसआयच्या या कटानंतर गुप्तचर यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत. याबाबत आयबीने अलर्टही जारी केला आहे. त्यानुसार सिख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने हा व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये तो भारत तोडण्यासाठी हिजाब जनमत संग्रहासारखा अजेंडा पसरवण्याचा प्रयत्न करत आहे.
शिख फॉर जस्टिसने आपल्या प्रचार व्हिडिओमध्ये कर्नाटकी हिजाब-समर्थन करणाऱ्या मुस्कानची छायाचित्रे देखील वापरली आहेत. पन्नू याने भारतीय मुस्लिमांना हिजाब सार्वमत सुरू करून भारताला उर्दुस्तान बनवण्याच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले आहे. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल यासारख्या मुस्लिमबहुल भागात हिजाब जनमत एजन्सी असल्याचे आयबीने म्हटले आहे.
Pakistani link to hijab controversy ISI’s attempt to create chaos with the help of Sikhs for Justice, IB issues alert
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे, राष्ट्रपतींच्या भेटीनंतर विधिमंडळ सदस्यत्वाचा अधिकार बहाल
- युक्रेनवर रशिया करणार आठवड्याभरात हल्ला : लष्कराने तिन्ही बाजूंनी घेरले, पाणीपुरवठा रोखला
- नागपुरात मिर्चीचा जोरदार ठसका; आवक कमी झाल्याने भाववाढ; मिरची झाली दामदुप्पट
- माघशुध्द एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आकर्षक नयनरम्य फुलांची आरास
Array