पुण्यात सोमवारी बालगंधर्व रंगमंदिरात लतादीदींची आदरांजली सभा

विशेष प्रतिनिधी

पुणे : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यासाठी सोमवार, दिनांक १४ फेब्रुवारी रोजी, सायंकाळी पाच वाजता, बालगंधर्व रंगमंदीर येथे विशेष आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार भूषवणार आहेत. Lata Mangeshkar Adaranjali Sabha on Monday

सुधीर गाडगीळ, रामदास फुटाणे व अनुराधा मराठे लतादीदींच्या आठवणी जागवतील. स्वरप्रतिभा दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित लतादीदींच्या लोकप्रिय हिंदी व मराठी निवडक एक हजार गाण्यांचे मुखडे, सहगायक, गीतकार, संगीतकार, चित्रपट व वर्ष यांची सूची व तीन पूर्व प्रकाशित लेख असलेला विशेषांक प्रकाशित केला जाणार आहे.



या नंतर लतादीदींच्या काही निवडक गाण्यांवर आधारित संगीतमय श्रद्धांजली कार्यक्रम पार्श्व गायिका स्नेहल आपटे, गीतांजली जेधे, हिम्मत कुमार व सहकारी सादर करतील. स्वरप्रतिभाचे संपादक प्रवीण प्र.वाळिंबे, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, कोहिनूर ग्रूपचे कृष्णकुमार गोयल यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

कृष्णकुमार गोयल( कोहिनूर ग्रूप) सुनील महाजन (अध्यक्ष संवाद ) प्रवीण प्र. वाळिंबे (संपादक, स्वरप्रतिभा) यांनी ही माहिती कळविली आहे. लडाख, जम्मू काश्मिर, पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, नागालँण्ड, ओरिसा, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ अशी राज्ये, महाराष्ट्रातील अनेक जिल्हे यामधील वृत्तपत्रांमध्ये लतादीदींचे सविस्तर वृत्त प्रकाशित झाले.

तसेच जगातील अनेक देशामधील अनेक वृत्तपत्रांमध्ये देखील याची मोठी नोंद घेण्यात आली आहे. स्वरप्रतिभा तर्फे याचे संकलन केले जात असून त्याचे प्रदर्शन लवकरच भरवण्यात येणार आहे. तसेच देशातील वृत्तपत्रांमधील अग्रलेख व विशेष लेखांचे संकलन असणारा स्वरप्रतिभा विशेषांक देखील यावेळी प्रकाशित केला जाईल, असे त्यांनी नमूद केले आहे.

Lata Mangeshkar Adaranjali Sabha on Monday

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात