प्रतिनिधी
अमरावती : महाराष्ट्राचे महिला बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती दडविण्याची शिक्षा मिळाली आहे. अमरारावती प्रथमवर्ग न्यायालयाने त्यांना दोन महिने सश्रम कारावास आणि 25 हजारांचा दंड ठोठावला आहे.Information hidden in election affidavit
बच्चू कडू यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या मुंबईतील फ्लॅट संबंधी माहिती दडवली. ती माहिती प्रतिज्ञापत्रात नव्हती. या संबंधी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील भनगरसेवक गोपाळ तिरमारे यांनी तक्रार दाखल केली होती. त्या केसचा आज निकाल लागला. त्यामध्ये बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावास आणि 25 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
मात्र, आपण मुंबईत 42 लाख 46 हजार रुपयांचा फ्लॅट घेतला होता परंतु कर्जफेड होण्यापूर्वीच तो विकून टाकला, असे बच्चू कडू यांनी 2017 मध्ये स्पष्ट केले होते. परंतु मूळ प्रतिज्ञापत्रात ही माहिती नाही हा तक्रारदाराचा दावा अमरावती प्रथमवर्ग न्यायालयाने मान्य केला आणि त्यानुसार बच्चू कडू यांना शिक्षा सुनावली. बच्चू कडू हे अमरावती न्यायालयाच्या निकालाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App