महाविकास आघाडीच्या सरकारचे स्टेरिंग कोणाच्या हाती?; अजितदादा – संजय राऊत यांची परस्पर विसंगत वक्तव्ये!!

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या ठाकरे पवार सरकारचे स्टेअरिंग नेमके कोणाच्या हाती आहे?, या मुद्द्यावर महाविकास आघाडीतले दोन वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची परस्पर विसंगत वक्तव्ये समोर आली आहेत.Contradictory statements of Ajit Dada and Sanjay Raut

अजितदादांनी आज सकाळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत मुंबईच्या विविध भागांचा दौरा करून विकास कामांची पाहणी केली. त्यावेळी स्वतः आदित्य ठाकरे यांनी गाडी चालवत अजितदादांचे सारथ्य केले. या मुद्यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाल्यानंतर अजितदादांनी त्या संदर्भात खुलासा केला. आदित्य ठाकरे यांनी गाडी चालवली त्यामुळे कुठलेही राजकीय वेगळा अर्थ काढू नका. महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची आघाडी होईल की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. सध्या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित चालू आहे. बाकीच्या काही पक्षांचाही सरकारला पाठिंबा आहे. अनेकांना गाडी चालवण्याची आवड असते. त्यातून आदित्य ठाकरे यांनी गाडी चालवली. उद्धव ठाकरे देखील अनेकदा स्वतः गाडी चालवत अनेक कार्यक्रमांना येत असतात, याची आठवण अजित पवार यांनी करून दिली.


Sanjay Raut : शरद पवार यांच्या भेटीला संजय राऊत ; नेमकी चर्चा कशावर ?


याच संदर्भात संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, की ठाकरे – पवार एकत्र आहेत यामुळे भाजपला पोटदुखी झाली आहे. अनेकांच्या पोटात वेगवेगळ्या पद्धतीच्या कळा येत असतात. भाजपला ठाकरे – पवार एकत्र आल्याने पोटात कळ आली आहे. महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचे आघाडीच्या सरकारचे स्टेअरिंग ठाकरेंच्या हाती आहे आणि ते यापुढेही राहील अशी ग्वाही संजय राऊत यांनी दिली.

आदित्य ठाकरे यांनी गाडी चालवली याचा वेगळा राजकीय अर्थ काढू नका, असे अजितदादांनी सांगणे आणि संजय राऊत यांनी सरकारचे स्टेअरिंग ठाकरेंच्या हाती आहे आणि यापुढेही राहील, असे सांगणे यातून शिवसेना – राष्ट्रवादीतल्या दोन मोठ्या नेत्यांची वेगवेगळी मते समोर आली आहेत.

Contradictory statements of Ajit Dada and Sanjay Raut

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात