वृत्तसंस्था
पुणे : पुणे शहराचा वीजपुरवठा आज पहाटेपासून ठप्प झाला. अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये ५ ठिकाणी बिघाड झाला. त्यामुळे कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे, पिंपरी व चिंचवड तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात पहाटे सहावाजल्यापासून वीज पुरवठा ठप्प आहे. Pune’s power supply disrupted since morning; Disrupted due to disturbance in high pressure tower line
लोणीकंद व चाकण येथे धुके व दवं यामुळे या टॉवर लाईनमध्ये बिघाड झाल्याची शक्यता वर्तविली आहे. दोन ४०० केव्ही अतिउच्च दाब असलेली ही उपकेंद्र बंद आहेत. त्यामुळे वीज पुरवठ्यात व्यत्यय आला आहे. दरम्यान महावितरणकडून याबाबतची माहिती वीज ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे देण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App