विशेष प्रतिनिधी
मुंबई : गायिका लता मंगेशकर आयसीयूमध्ये दाखल असलेल्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. Increased safety outside Breach Candy Hospital
लता मंगेशकर यांची बहीण आशा भोसले, भाऊ हृदयनाथ, रश्मी उध्दव ठाकरे, सुप्रिया सुळे, मधुर भांडारकर, भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह त्यांच्या प्रक्रुतीची विचारपूर्वक करण्यासाठी सायंकाळपासून अनेक नामवंतांची रिघ लागली आहे.
पार्श्वगायिका लता मंगेशकर उर्फ ‘दीदी’ (वय 92) यांची प्रकृती शनिवारी दुपारी बिघडली. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. लता मंगेशकर यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर जानेवारीच्या सुरुवातीपासून मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.
मंगेशकर आजही मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग, आयसीयूमध्ये उपचार घेत असून आठ दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर काढण्यात आला. 8 जानेवारी रोजी त्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 27 जानेवारी रोजी सुधारणा दिसून आल्याने त्यांचा व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App