पत्नीचा काेराेनाने मृत्यू झाल्यावर सरकारी मदत म्हणून मिळालेली 50 हजार रुपयांची रक्कम चाेरट्यांनी बॅंकेतून परतत असतानाच पळवून नेली. वृद्धाच्या दु:खाने पाेलीसांमधील माणुसकी जागृत हाेऊन वर्गणी काढून त्यांनी ही रक्कम दिली.Charity snatches Rs 50,000 help for wife Kareena’s death
विशषे प्रतिनिधी
नंदूरबार : पत्नीचा काेराेनाने मृत्यू झाल्यावर सरकारी मदत म्हणून मिळालेली 50 हजार रुपयांची रक्कम चाेरट्यांनी बॅंकेतून परतत असतानाच पळवून नेली. वृद्धाच्या दु:खाने पाेलीसांमधील माणुसकी जागृत हाेऊन वर्गणी काढून त्यांनी ही रक्कम दिली.
पदम हारचंद कोळी या शहादा तालुक्यातील डामरखेडा येथे राहणाऱ्या वृध्दाेच्या घरी अठराविश्व दारिद्र्य, संजय गांधी निराधार योजनेच्या मदतीवर ते जगत हाेते. त्यातच पत्नीस कोरोना झाला. उपचाराच्या खर्चामुळे ते हवालदील झाले हाेते. मात्र, पत्नी कोरोनातून बाहेर आली नाही. वृद्धापकाळात जगणे आणखीच हलाखीचे झाले.
पत्नीच्या कोरोनामुळे निधन झाल्याने शासकीय योजनेतून ५० हजार रुपये मंजूर झाल्याचे समजले. प्रकाशा येथील स्टेट बॅंकेत ५० हजार त्यांनी बॅंकेतून काढून घेतले. परतत असताना पाणी पिण्यासाठी एका टपरीवर थांबले असताना चाेरट्याने ही रक्कम पळून नेली.
नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी बातमी वाचून या वृध्दाला समक्ष हजर करण्याचे शहादा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना सांगितले. आल्यावर कांनी ५० हजार रुपये त्यांच्या हातात ठेवले. चाेरलेले पैसे आम्ही शाेधून देऊच असे सांगत आम्ही तुमच्यासाठी वर्गणी काढून पैसे जमवले आहेत त्याचा स्वीकार करा अशी विनंती केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App