विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी लोकसभेत केलेले भाषण व्हायरल होतेय. याचे कारण म्हणजे तुम्ही माझा अपमान करा. मला त्याने फरक पडत नाही. पण तुम्ही या देशाच्या लोकांचा अपमान करू शकत नाही असे म्हणत राहूल गांधी यांनी दोन हिंदुस्थान बनवले जात आहेत, एक हिंदुस्थान श्रीमंतांचा आणि दुसरा हिंदुस्थान गरीबांचा. या दोन हिंदूंमधील दरी वाढत आहे, असे म्हटले आहे.Why is Rahul Gandhi’s speech going viral on social media?
राहूल गांधी यांनी लोकसभेत अंबानी आणि अडानी यांचे नाव घेतले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत डबल ए व्हेरिएंट पसरत आहे. डबल ए म्हणजे अंबानी आणि अदानी. दोन हिंदुस्थान बनवले जात आहेत, एक हिंदुस्थान श्रीमंतांचा आणि दुसरा हिंदुस्थान गरीबांचा, या दोन हिंदूंमधील दरी वाढत आहे. गरीब हिंदुस्थानात आज रोजगार नाही. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात बेरोजगारीबद्दल एक शब्दही नव्हता.
राहुल गांधी म्हणले, माझ्या पणजोबांनी हा देश उभा करताना १५ वर्ष तुरुंगात काढली. माझ्या आजीवर ३२ गोळ्या झाडल्या गेल्या आणि माझ्या वडिलांच्या चिंधड्या उडवण्यात आल्या. त्यामुळे मी या देशाला थोडंफार ओळखतो. माझ्या पणजोबांनी, माझ्या आजीने आणि माझ्या वडिलांनी या देशासाठी रक्त सांडलं आहे.
राहूल गांधी म्हणाले, देश चालवण्यासाठी केंद्र आणि राज्य यांच्यातील संवाद आवश्यक आहे. भारत हे साम्राज्य नाही आणि राज्ये दडपली जाऊ शकत नाहीत. तीन हजार वर्षांचा इतिहास बघा. मौर्य वंश पहा, अशोक पहा. संवाद आणि कराराशिवाय कोणीही राज्य केलेले नाही.
https://youtu.be/t3a97iyWzXc
देशातील प्रत्येक राज्याची स्वत:ची भाषा, स्वत:ची संस्कृती आहे. हे विविधतांचे पुष्पगुच्छ आहे. किंग ऑफ इंडिया संकल्पना परत आणली जात आहे. – भारत युनियन ऑफ स्टेट्स् आहे तो नेशन नाही. एक व्यक्ती राज्यांतील लोकांवर सत्ता गाजवू शकत नाही. विविध भाषा आणि संस्कृतींची गळचेपी करणे अशक्य आहे. ही भागीदारी आहे, राजसत्ता नाही.
संघराज्य सहकार्य महत्त्वाचे आहे. काँग्रेसने १९४७ मध्ये राजेशाही संपविली ती परत आणली जात आहे. केंद्राच्या काठीने देशावर राज्य करता येत नाही, वेळोवेळी ही काठी तुटली. संवाद आणि चर्चेला महत्त्व देणाºयांनाच या देशावर राज्य करता आले.
भाजप आणि रा.स्व.संघाकडून देशाच्या पायावरच हल्ला करत आहे. तुम्ही आधीच समस्या निर्माण करायला सुरुवात केली आहे. पूर्वेकडे समस्या सुरू झाली आहे. तामिळनाडूमध्येही समस्या निर्माण होत आहेत. त्या तुम्हाला दिसणं आता बंद झालं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये देखील समस्या निर्माण होत आहेत. तुम्ही जे करत आहेत, त्यातून तुमचं इतिहासाचं आकलन कमी असल्याचं दिसून येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App