प्रतिनिधी
मुंबई : शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकार मधले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज एक राजकीय बॉम्बगोळा फेकला आहे. पोलिसांच्या बदल्यांची यादी शिवसेनेचे वरिष्ठ मंत्री हे अनिल परब हेच आपल्याला आणून द्यायचे, असा दावा अनिल देशमुख यांनी करून शिवसेनेवर राजकीय बॉम्बगोळा फेकला आहे. Anil deshmukh – Anil parab political fight comes out in police transfers
अनिल देशमुख यांनी ईडीच्या तपासात दिलेल्या जबाबात हा दावा केला आहे. अनिल परब यांना संबंधित पोलिसांच्या बदल्यांची यादी कोण घ्यायचे?, असा सवाल ईडी च्या अधिकाऱ्यांनी विचारल्यानंतर कदाचित शिवसेना आमदार आणि अन्य मंत्री त्यांना अनुकूल असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची यादी अनिल परब यांच्याकडे देत असावेत आणि ते माझ्याकडे गृहमंत्री या नात्याने पोलिसांच्या बदल्या करण्याची यादी देत असावेत, असा जबाब अनिल देशमुख यांनी ईडीला दिला आहे.
अनिल देशमुख यांच्या दाव्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष उफाळण्याची जबरदस्त चिन्हे असून अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला गेला. परंतु शिवसेनेत अनिल परब अजूनही मंत्रिपदावर टिकून आहेत. या पार्श्वभूमीवर दोन पक्षांमध्ये राजकीय घमासान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गृहमंत्री राहिलेले अनिल देशमुख यांनी ईडीला दिलेल्या जबाबात अनिल परब यांचे नाव घेतल्याने शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कारण अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे आता अनिल परब यांचे नाव पोलिसांच्या बदली प्रकरणात अनिल देशमुख यांनी घेतल्यामुळे पोलिसांच्या बदल्यांच्या यादीत मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात देखील बोट दाखवले गेले आहे का?, असा कळीचा सवाल आता उपस्थित होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App