विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रात सुपरमार्केटमधून वाईन विक्रीस मूभा देण्याचा निर्णय ठाकरे – पवार सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वीच घेतला. पण राज्य सरकारच्या या निर्णयाला विविध क्षेत्रातून विरोध झाला आहे. आता सुपर मार्केटमधील वाईन विक्रीच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरो वा कुंजरो वा भूमिका घेतली आहे. Narrow or Kunjaro: The decision to sell wine in the supermarket is in the interest of farmers, but can be changed in case of opposition: Sharad Pawar
शेतकर्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून सरकारने निर्णय घेतला आहे, पण राज्यातून विरोध होत असेल तर तो निर्णय बदलायला हरकत नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. ते बारामतीत गोविंदबाग निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले, की सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नाही. सरकारच्या निर्णयाला जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि राज्य सरकारने हा निर्णय बदलला तरी त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही.
राज्य मंत्रिमंडळाने वाईन विक्रीसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केल्यानंतर सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येणार आहे. राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा प्रस्ताव मांडला होता.
देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानात देशी आणि विदेशी दारू मिळते, त्यात वाईन ही अत्यंत कमी प्रमाणात विकली जाते. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकूण 18 वायनरी असून त्या वाईनचे उत्पादन घेतात. ही वाईन केवळ मोठाल्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने मंजुरी दिली आहे. वायनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न मिळते, मात्र त्याला विरोध होत असले तर सरकारने या संदर्भात काही वेळा निर्णय घेतला, तो निर्णय मागे घेतला तरी त्याचे वाईट वाटण्याचे कारण नाही, असेही शरद पवार म्हणाले.
शरद पवारांनी उत्तर प्रदेश आणि पंजाब विधानसभा निवडणुकीविषयी भाकीत केले. या दोन्ही राज्यांमध्ये शेतकरी आंदोलनाचा फटका भाजपला बसल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App