विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात किराणा दुकान, सुपर मार्केट आणि मॉल्समध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे. किराणा दुकानात आला दारूचा माल, आता लोकांचे होणार हाल, अशा काव्यमय शब्दात रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे.Liquor has arrived in the grocery store, now the people will be in trouble, Ramdas Athavale
राज्यातील १ हजार चौरस फुटापेक्षा अधिक जागा असलेल्या सुपर मार्केट, किराणा दुकान आणि मॉल्समध्ये वाईनची विक्री करता येणार असल्याच्या नव्या वाईन विक्री धोरणाला राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत हिरवा कंदिल दाखवला आहे. ठाकरे सरकारच्या याच निर्णयावर प्रमुख विरोधीपक्ष भाजपाकडून जोरदार विरोध सुरू आहे.
राजभवनात आयोजित पर्यावरण सोहळ्याला रामदास आठवले उपस्थित होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आठवले यांनी ठाकरे सरकारच्या नव्या वाईन विक्री धोरणावर टीका केली.सरकारच्या या निर्णयाविरोधात आरपीआय आंदोलन करेल, असा इशारा देखील आठवले यांनी दिला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला शह देऊ असा विश्वास व्यक्त करून रामदास आठवले म्हणाले, एप्रिल महिन्यात महापालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपा आणि आरपीआय निवडणूक जिंकेल. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळे निवडणूक लढतील यामुळे भाजपा आणि आरपीआय शिवसेनाला पराभूत करेल.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, राज्य सरकारमध्ये काय चाललंय हे सरकार मधल्यांनाही कळत नाही आणि जनतेलाही कळत नाही. आज वाईन विकायला चाललेत. उद्या बियर विकतील, पुढे दारू विकायला लागतील.
राज्यातील काही जिल्हे आम्ही दारूमुक्त केले होते. चंद्रपूरमध्येही आम्ही दारूबंदी केली. हे सरकार सत्तेवर आलं नाही तोवर दारुविक्री पुन्हा सुरू झाली. आता केवळ चंद्रपूरला दारू सुरू करून थांबले नाहीत. आता तर सगळ्या महाराष्ट्रात पानटपरीवर वाईन विकायला लागलेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App