विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) संजय पांडे यांनी महाराष्ट्रातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देणारा आदेश जारी केला. डीजीपीच्या आदेशानुसार आता संपूर्ण महाराष्ट्रात महिला पोलिसांना 12 ऐवजी आठ तास ड्युटी करावी लागणार आहे. Maharashtra Women Police now on 8-hour duty
महिला पोलिसांसाठी कमी केलेले तास प्रायोगिक तत्त्वावर लागू केला जाईल. साधारणपणे, महिला आणि पुरुष दोघांचीही 12 तासांची ड्युटी असते. महिलांसाठीची आठ तासांची ड्युटी पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे ‘डीजीपी’ने गुरुवारी जारी केलेल्या निर्देशात म्हटले आहे.
आदेशाची अंमलबजावणी होत असल्याची खात्री युनिट कमांडर्सनी करावी, असेही त्यात म्हटले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महिला अधिकाऱ्यांना चांगले काम, जीवन संतुलन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
यापूर्वी ही प्रणाली नागपूर शहर, अमरावती शहर आणि पुणे ग्रामीण भागात लागू करण्यात आली होती, असे या अधिकाऱ्याने सांगितले. आपत्कालीन परिस्थितीत किंवा सणासुदीच्या काळात महिला कर्मचार्यांच्या ड्युटी तासांमध्ये वाढ करता येणार असली, तरी संबंधित जिल्हा पोलिस अधीक्षक किंवा पोलिस उपायुक्तांच्या परवानगीनेच हे काम करता येईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App