विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काही लोकांकडून संभ्रम निर्माण करण्यासाठी खोडसाळ प्रचार केला जात आहे. माझ्या ट्विटर प्रोफाइलमध्ये काहीही काढले किंवा जोडले गेले नाही. प्रोफाइल पूर्वीप्रमाणेच आहे,असे म्हणत माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ कॉँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी कॉँग्रेसच्या नेत्यांना फटकारले आहे.Ghulam Nabi Azad slaps Congress leaders
आझाद यांना मोदी सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. त्यामुळे कॉँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर टीका सुरू केली होती. आझाद भाजपला जाऊन मिळणार असल्याच्या कंड्याही पिकविल्या जात होत्या. आझाद यांनी कॉँग्रेसमधील गांधी कुटुंबाच्या एकाधिकारशाहीवर टीका केली होती.
त्याचबरोबर संघटनेत फेरबदल करण्याचीही मागणी केली होती. त्यामुळे गांधी कुटुंबाच्या निष्ठावंतांकडून आझाद यांची बदनामी सुरू आहे. त्यांनी आपले ट्विटर प्रोफाइल बदलल्याचेही म्हटले आहे. परंतु, आझाद यांनी त्याचा इन्कार केला आहे.
गुलाम नबी आझाद हे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आहेत. राज्यसभेतील कॉँग्रेसचे नेते म्हणूनही त्यांनी काम केले होते. मात्र, त्यांनी कॉँग्रेस नेतृत्व आणि प्रामुख्याने राहूल गांधी यांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे त्यांना कॉँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारीही नाकारण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App