Mumbai : वांद्र्यात चार मजली इमारत कोसळली ,15 जण जखमी ; 6 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल


कोसळलेली इमारत खूप जुनी होती तसेच ती इमारत बेकायदेशीर देखील होती.या इमारतीला काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेकडून नोटीसही देण्यात आली होती.Mumbai: Four-storey building collapses in Bandra, 15 injured; 6 ambulances rushed to the spot


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत वांद्रे परिसरात चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटना ही आज संध्यकाळी जवळपास चार वाजता घडली आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निमनदलाच्या पाच गाड्या आणि सहा रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेत पंधराजण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.कोसळलेली इमारत खूप जुनी होती तसेच ती इमारत बेकायदेशीर देखील होती.या इमारतीला काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेकडून नोटीसही देण्यात आली होती.पण तरीही काही कुटुंब त्या इमारतीत वास्तव्यास होते.

इमारत कोसळताना परिसरात मोठा आवाज आला.दरम्यान स्थानिकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले.तसेच प्रशासनाला तातडीने या घटनेची माहिती देण्यात आली.

Mumbai : Four-storey building collapses in Bandra , 15 injured ; 6 ambulances rushed to the spot

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय