भारत आज ७३वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यावेळी अटारी-वाघा सीमेवर सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पाकिस्तान रेंजर्समध्ये मिठाईची देवाणघेवाण झाली. यावेळी पाक रेंजर्सनी बीएसएफ अधिकाऱ्यांना ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यापूर्वी दिवाळीनिमित्तही भारत आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई दिली होती. WATCH Republic Day celebrations at Attari-Wagah border, BSF-Pak Rangers officials exchanged sweets
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारत आज ७३वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यावेळी अटारी-वाघा सीमेवर सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पाकिस्तान रेंजर्समध्ये मिठाईची देवाणघेवाण झाली. यावेळी पाक रेंजर्सनी बीएसएफ अधिकाऱ्यांना ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यापूर्वी दिवाळीनिमित्तही भारत आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई दिली होती.
#WATCH Border Security Force & Pakistan Rangers exchange sweets and greetings at JCP Attari on India's 73rd Republic Day pic.twitter.com/nTD23Wf937 — ANI (@ANI) January 26, 2022
#WATCH Border Security Force & Pakistan Rangers exchange sweets and greetings at JCP Attari on India's 73rd Republic Day pic.twitter.com/nTD23Wf937
— ANI (@ANI) January 26, 2022
स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाव्यतिरिक्त ईद, होळी, दिवाळी या दिवशी भारत आणि पाकिस्तानमध्ये मिठाईची देवाणघेवाण करण्याची परंपरा आहे. गेल्या वेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त बीएसएफने पाकिस्तान रेंजर्सच्या अधिकाऱ्यांसोबत मिठाईची देवाणघेवाण केली नव्हती. दोन्ही देशांमधील बिघडलेल्या द्विपक्षीय संबंधांमुळे बीएसएफने हे पाऊल उचलले होते.
भारत आपला 73वा प्रजासत्ताक दिन दिल्लीतील राजपथवर परेडसह साजरा करत आहे, ज्यामध्ये ते आपले लष्करी सामर्थ्य दाखवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला पुष्पहार अर्पण केला. भारतातील जनतेचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.”
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवला. ते म्हणाले की, या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या त्या सर्व शूर सैनिकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App