विशेष प्रतिनिधी
पुणे : विश्रांतवाडी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय मुलांचे शासकीय वसतीगृह हे कोविड काळजी केंद्र म्हणून वापरात आणले जात आहे. कैद्यांना, बंद्यांना ठेण्याकरीता तात्पुरत्या कारागृहासाठी म्हणून पुढील आदेशापर्यंत ते अधिग्रहीत करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. Use of Government Hostel for Temporary Prison
कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून पोलीस ताबा व नव्याने दाखल होणारे परंतू लक्षणे नसलेले कोरोना बाधित कैदी तसेच कारागृहातील चाचणीमध्ये कोरोना बाधित आढळून येणाऱ्या कैद्यांसाठी येरवडा कारागृहात जागा अपुरी आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला.
पुणे शहर पोलीस आयुक्त यांना तात्पुरत्या कारागृहाच्या ठिकाणी सुरक्षितेच्या दृष्टीने इमारतीच्या चारही बाजूने चोवीस तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा असे आदेश देण्यात आले.
त्या परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त पुरविण्याचे तसेच अधीक्षक येरवडा मध्यवती कारागृह यांनी तात्पुरत्या कारागृहाच्या दैनंदिन कामकाजासाठी एक तुरुंगाधिकारी व एक लिपीक किंवा रक्षक यांची नियुक्ती करावी असे आदेश देण्यात आले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App