दिल्लीतील काही लोक मला नेहमी टोमणे मारत अपमान करत असतात. त्यांना मला लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत. त्यांना मला सांगायचं आहे की जम्मू काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका लोकशाहीचं उदाहरण आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना लोकशाहीचा अर्थ समजावून सांगितला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीतील काही लोक मला नेहमी टोमणे मारत अपमान करत असतात. त्यांना मला लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत. त्यांना मला सांगायचं आहे की जम्मू काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका लोकशाहीचं उदाहरण आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना लोकशाहीचा अर्थ समजावून सांगितला आहे. Prime Minister Narendra Modi explained to Rahul Gandhi the meaning of democracy
मोदी म्हणाले की, काही राजकीय लोक सारखं लोकशाहीवर लेक्चर देत असतात. पण त्यांचा दुटप्पीपणा आणि खोटारडेपणा तर पहा की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही पाँडिचेरीमध्ये स्थानिक निवडणूक झालेली नाही. तर दुसरीकडे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर एका वर्षाच्या आतच पंचायत स्तरीय निवडणुका झाल्या आहेत. जम्मू काश्मीरमधील स्थानिक निवडणुकांमुळे लोकशाहीचा पाया घट्ट झाला आहे.
राहुल गांधी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची गुरुवारी भेट घेतली होती. कोणतीही चर्चा न करता संमत केलेले कायदे रद्द झाले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली होती. मोदी अकार्यक्षम असून त्यांना प्रशासन कसे चालवले जाते याची यत्किंचितही माहिती नाही. त्यांच्या नजीकच्या तीन-चार भांडवलदारांच्या आधारे ते देश चालवत आहेत, असा आरोप त्यांनी केला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App