राष्ट्रवादीचे खासदार, सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी एका चित्रपटात राष्ट्रपिता महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसेची भूमिका केल्याने महाराष्ट्रात वादळ उठले आहे. या वादळाच्या अनेक पैलूंचे वेध घेणारे अनेक लेख ‘द फोकस इंडिया’ प्रकाशित करत आहे. त्यापैकी हा महत्त्वाचा लेख…A role from Kiran Mane; Then Dr. Why another role about Amol Kolhen
गांधी हत्येविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका ‘बरं झालं गांधी मेला’ अशीच होती. त्यावर मंत्री जितेंद्र आव्हाड आणि इतर कथित पुरोगामी नेत्यांचे, विचारवंतांचे काय म्हणणे आहे? बाबासाहेब समकालीन होते. बाबासाहेबांना चॅलेंज करण्याची लायकी कुणाचीच नाही. त्यांनी संधी मिळेल तेंव्हा गांधी हत्येचे समर्थन केले. कधी उघड तर कधी अपरोक्षपने. मी हे म्हणत नाही की बाबासाहेब चूक होते की बरोबर? पण ह्या नव लीब्रांडू जमातीने प्रत्येक घटनेतून जातीवाद वाढवण्याची भूमिका घेण्याचा चंग बांधलेला दिसतो. तो थांबला पाहिजे, कारण बाबासाहेबांनी नथुराम हा केवळ ब्राम्हण आहे म्हणून तिरस्कार केला नाही. किंवा मिळाला बकरा म्हणून लगेच ‘हिंदू दहशतवादी’ असतात असली मांडणी केली नाही.
मी उत्सुकता म्हणून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. अन् बाबासाहेबांची वेगळी उंची दिसून आली. गांधी च्या अहिंसेने लढवय्ये हिंदू षंढ होतील का? इथपर्यंत भीती बाबासाहेबांना वाटत होती. तो लेख नंतर लिहितो. सध्या नथुराम बाबत…
महात्मा गांधी मृत्यू संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी लिहितात. बायबल चा संदर्भ देऊन बोलतात. “कधी कधी वाईटातूनही चांगले घडून येते. माझ्या मते गांधी च्या मृत्युतून चांगलेच काहीतरी घडून येईल” (Sometimes good come out of evil, so also I think good will come out of the death of Mr. Gandhi)- संदर्भ : Letters of Ambedkar, page no- 205.
त्या पुढे जाऊन बाबासाहेबांनी नथुराम गोडसे च्या वकिलाला मदत करण्यासाठी संपर्क केला आणि म्हणाले “मी कायदा मंत्री असल्याने फाशीच्या शिक्षेला जन्म ठेपे मध्ये बदलू शकतो.” त्याही पुढे जाऊन बाबासाहेबांना वाटत होतं की नथुरामला मृत्युदंड देण्याने गांधीच्या अहिंसेच्या वारश्याला श्रद्धांजली भेटेल असे दिसत नाही. पण नथुराम म्हणाला, की मला शिक्षेची माफी भेटू नये. कारण माझ्या फासावर जाण्याने गांधीच्या अहिंसेलाच फासावर लटकवले मला जगाला दाखवायचे आहे.
मला एकच म्हणायचे आहे की हे पुरोगामी लोक सोयीप्रमाणे महापुरुषांचा वापर करून घेतात. अन् जातीवाद वाढवून स्वतःचे राजकारण साधून घेत असतात. या लोकांनी शिवाजी महाराजांचा सोयीप्रमाणे वापर केला. महात्मा फुल्यांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा केवळ वापर करून घेत एखाद्या जातीच्या आडून आमच्या संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न नेहमी करतात.
इतिहासकार, विचारवंतांनी आपल्या निष्ठा समाजाप्रती, राष्ट्राप्रती ठेवल्या पाहिजेत. राजकीय पक्षांच्या दावणीला बांधून घेऊन त्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण करून देण्यास स्वतःची तपस्या वाया घालवू नये. तुम्ही देशाला दिशा दिली पाहिजे. नाहक देशाला क्षुल्लक जातीवादात अडकवू न तो खिळखिळा करण्यात काहीही हाशिल होणार नाही शिवाय अराजकतेच्या.
कोण तो किरण माने? त्याला मालिकेतून काढला म्हणून एका प्रकारे जातीवाद. अन् राष्ट्रवादीचेच खासदार अमोल कोल्हे यांनी भूमिका केली म्हणून वेगळ्या पद्धतीचा जातीवाद उभा केला जात आहे.
मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळावे, त्यातून सर्व बहुजन खऱ्या अर्थाने एकत्र करावे हे कोणता भामटा लिहितोय, बोलतोय? नाही, यांना लोक हिताशी काहीही घेणे देणे नाही. फक्त स्वार्थ महत्वाचा मानून समाज तोडण्याचा विकृत असुरी आनंद घेण्यात धन्यता मानतात. त्याचा जाहीर निषेध.
(सौजन्य : फेसबुक)
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App