उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत अपर्णा त्यांचे सासरे मुलायम सिंह यादव यांचे आशीर्वाद घेत आहेत. अपर्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले होते की, नेताजी (मुलायम यादव) यांनी अपर्णा यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला होता. UP Elections After joining BJP Aparna Yadav takes blessing from father-in-law Mulayam singh yadav, photo goes viral
वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत अपर्णा त्यांचे सासरे मुलायम सिंह यादव यांचे आशीर्वाद घेत आहेत. अपर्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले होते की, नेताजी (मुलायम यादव) यांनी अपर्णा यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला होता.
2017 मधील विधानसभा निवडणुकीत लखनऊ कॅंटमधून भाजप नेत्या रिता बहुगुणा जोशी यांच्याकडून पराभवाचा सामना करणाऱ्या अपर्णा यादव यांनी भाजप प्रवेश करून केल्याने अंतर्गत मतभेदांच्या मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना कोंडीत पकडण्याचा मुद्दा भाजपला दिला आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव म्हणाल्या होत्या की, माझ्यावर नेहमीच पंतप्रधानांचा प्रभाव राहिला आहे. माझ्या विचारात राष्ट्र नेहमीच प्रथम आहे. राष्ट्रवाद माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. मला एवढेच सांगायचे आहे की, आता मी राष्ट्रपूजा करण्यासाठी बाहेर पडले आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोवा, पंजाब आणि मणिपूरमध्येही निवडणुका आहेत. पंजाब वगळता उर्वरित चार राज्यांमध्ये भाजपची सरकारे आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App