
विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्याची राजकीय हेतूंनी केली जाते आहे. ठाकरे – पवार सरकारने मध्यंतरी भरती प्रक्रिया सुरू करण्याचाही प्रयत्न केला. पण काहीजणांच्या दबावातून ती प्रक्रिया पुढे गेली नाही. पण मी त्यांची नावे घेणार नाही, असे राज्याचे इतर मागास कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांना काही बोलायचे आहे पण ते बोलत नाहीत. याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली. vijay vadettiwar avoids to name any one for delayed recruitment processes in maharashtra
त्यांच्या उपस्थितीत आज पुण्यात ओबीसी , व्ही जे एन टी जनमोर्चाची संवाद परिषद पार पडली. या परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी एम पी एस सी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना वडेट्टीवार यांनी ज्या संघटना मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करावा अशी मागणी करतायत त्या राजकीय दृष्टीने प्रेरित आहेत असा आरोप केला .
‘महाविकास आघाडी सरकारने भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला. परंतु काही जणांचा दबाव आहे त्यामुळे भरती होऊ शकली नाही . मात्र मी त्यासाठी कोणाचेही नाव घेणार नाही, असे वडेट्टीवार म्हणाल्याने त्यांच्या या वक्तव्यावरून नेमका कोणी दबाव आणला, प्रक्रिया कशी थांबविली गेली, यावर चर्चा सुरू झाली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही संघटना वडेट्टीवार यांच्यावर ते समाजा-समाजांमधे भांडणं लावण्याच काम करत असल्याचा आरोप करत असताना महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवण्याच काम आम्ही करत नाहिये, तर आमच्यावर आरोप करणारे करतायत असा दावा वडेट्टीवार यांनी केला.
vijay vadettiwar avoids to name any one for delayed recruitment processes in maharashtra
जे आमच्यावर आरोप करतायत त्यांनी इतिहास वाचावा असंही वडेट्टीवार म्हणाले. या परिषदेत राज्यातील भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची आणि ज्यांची निवड झालीय त्यांचा नियुक्त्या लवकरात लवकर करण्याची मागणी करण्यात आली. वडेट्टीवार यांनीही विद्यार्थ्यांना राज्यातील भरती प्रक्रिया ही जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.
Array