श्रीमंत शेतकरी आंदोलनाचा उत्तर रेल्वेला २४०० कोटींचा फटका; उत्तर रेल्वेचे जनरल मॅनेजर आशुतोष गांगल यांची माहिती


वृत्तसंस्था

अमृतसर : दिल्लीच्या वेशीवर श्रीमंत पंजाबी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे रेल्वेच्या माल वाहतूकीवर प्रतिकूल परिणाम झाला असून गेल्या महिनाभरात उत्तर रेल्वेला साधारणपणे २४०० कोटी रूपयांचा फटका बसल्याचा अंदाज आहे. farmers’ agitation: Ashutosh Gangal, GM, Northern Railway

उत्तर रेल्वे विभागाचे जनरल मॅनेजर आशुतोष गांगल यांनी ही माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. आम्ही रेल्वेची माल वाहतूक सुरळित ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत. नोव्हेंबर महिन्यात माल वाहतूकीत फारसा अडथळा आला नाही. पण आंदोलनामुळे गाड्या स्थानकांवर पोहोचायला आणि माल उतरायला नियोजित वेळेपेक्षा खूपच वेळ लागत होता.

farmers’ agitation: Ashutosh Gangal, GM, Northern Railway

आता शेतकरी आंदोलनामुळे बियास ते अमृतसर अंतरातील एक मार्ग पूर्णपणे बंद ठेवावा लागला आहे. त्यामुळे माल वाहतूकीवर प्रतिकूल परिणाम होतो आहे. त्यामुळे रेल्वेच्या नुकसानी बरोबर मालाचेही नुकसान होतेय. या शेतकरी आंदोलनामुळे अंदाजे २४०० कोटी रूपयांचे नुकसान उत्तर रेल्वेला सहन करावे लागले आहे, असे गांगल यांनी स्पष्ट केले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात