विशेष प्रतिनिधी
पुणे : अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे दिल्या जाणार्या 2020-21 या वर्षाच्या बाल वाड्मय पुरस्काराची घोषणा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे यांनी शनिवारी केली. यावेळी खजिनदार डॉ. दिलीप गरूड, कार्यवाह मुकुंद तेलीचरी, सहकार्यवाह सुनील महाजन उपस्थित होते.Announcement of ‘Marathi balkumar sahitya’ Literature awards
विज्ञानविषयक पुरस्कार डॉ. सुनील विभुते यांच्या अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा या पुस्तकाला जाहीर झाला आहे. बाल एकांकिकेचा पुरस्कार प्रभाकर शेळके यांच्या कोरोना राक्षस या पुस्तकाला, बाल कादंबरीचा पुरस्कार नागेश शेवाळकर यांच्या समूदादा या पुस्तकाला,
शैक्षणिक साहित्याचा पुरस्कार डॉ. नीलिमा गुंडी यांच्या भाषेची भिंगरी या पुस्तकाला, बाल कवितेचा पुरस्कार वीरा राठोड यांच्या हाडेल हप्पी, जादूची झप्पी या पुस्तकाला, बाल कथा संग्रहाचा पुरस्कार प्रा. सुहास बारटक्के यांच्या बांधामधला धामण या पुस्तकाला जाहीर झाला आहे.
तसेच मुलांनी लिहिलेल्या साहित्याचा पुरस्कार मुग्धा घेवरीकर हिच्या मुग्धाच्या कविता या पुस्तकाला व पीयुष गांगुर्डे याच्या काळजातली माया पुस्तकाला दिला जाणार आहे.
सुनील महाजन म्हणाले, पुरस्कारासाठी राज्यभरातून 150 पेक्षा अधिक पुस्तके प्राप्त झाली होती. लवकरच कोरोना नियमांचे पालन करून पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. कविता मेहेंदळे आणि निर्मला सारडा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App