ठेवींसंदर्भातील आकडेवारीनुसार एफपीआयने १ डिसेंबर ते १८ डिसेंबरदरम्यान थेट ४८ हजार ८५८ कोटी तर बॉण्डच्या माध्यमातून ६११२ कोटी रुपये गुंतवले आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना लॉकडाउननंतर आता भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा सावरण्याच्या पाऊलखुणा ठळक होत आहेत. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक म्हणजेच एफपीआयच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेमध्ये डिसेंबर महिन्याच्या पहिल्या १८ दिवसांमध्ये ५४ हजार ९८० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. जागतिक बाजारांमध्ये अतिरिक्त पैसा आणि विविध क्षेत्रांसाठी केंद्रीय बँकांना आणखीन एक प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली जाण्याची शक्यता असल्याने एफपीआयच्या माध्यमातून गुंतवणूक केली जात आहे.
more investment coming in from FPI boosting indian economy
ठेवींसंदर्भातील आकडेवारीनुसार एफपीआयने १ डिसेंबर ते १८ डिसेंबरदरम्यान थेट ४८ हजार ८५८ कोटी तर बॉण्डच्या माध्यमातून ६११२ कोटी रुपये गुंतवले आहेत. त्यामुळेच या १८ दिवसांमध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये परदेशी गुंतवणुकदारांनी ५४ हजार ९८० कोटींची गुंतवणूक केली आहे.
नोव्हेंबर महिन्यामध्ये एपफीआयच्या माध्यमातून ६२ हजार ९५१ कोटींची गुंतवणूक झाली होती. मॉर्निंग स्टार इंडियाशी संलग्न अशणारे निर्देशक आणि जाणकार हिमांशू श्रीवास्तव यांनी, “जागतिक बाजारपेठेत असणारा अतिरिक्त पैसा आणि कमी व्याजदरांमुळे भारतासारख्या वाढणाऱ्या बाजारपेठेमध्ये ही परदेशी गुंतवणूक येतेय,” अस मत व्यक्त केले आहे.
वेगवेगळ्या देशांमधील केंद्रीय बँकांकडून आर्थिक विकासाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी नवीन प्रोत्साहन पॅकेजची घोषणा होण्याच्या आशेने गुंतवणुकदार धोका पत्कारण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे, असं श्रीवास्तव म्हणाले. तसेच करोनाची लस आल्याने भारतासारख्या वाढ अपेक्षित असणाऱ्या बाजारपेठांमध्ये गुंतवणुकीस चालना मिळण्याची शक्यता आहे. यामुळेच गुंतवणूक वाढली असून गुंतवणुकीला बळ मिळत आहे, असंही सांगितलं जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App