ममतांवर वार, प्रशांत किशोर घायाळ; स्वीकारले भाजपचे आव्हान


  • २०० जागा सोडा, भाजपला दोन आकडी संख्याही गाठता येणार नाही
  • भाजपला जास्त यश मिळाले तर निवडणूक रणनीतीकाराचे काम सोडेन

वृत्तसंस्था

कोलकाता : ममतांवर वार, प्रशांत किशोर घायाळ; स्वीकारले भाजपचे आव्हान, अशी परिस्थिती बंगालमध्ये उदभवली आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या नेतृत्वावर राजकीय वार केले. पण त्याने ममतांपेक्षा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोरच अधिक घायाळ झालेत. prashant kishor accepts challange from bjp

आता त्यांनी स्वतःहून पुढे येऊन भाजपचे आव्हान स्वीकारले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत २०० जागा सोडा, भाजपला दोन आकडी जरी संख्या गाठता आली तरी मी निवडणूक रणनीतीचे काम सोडून देईन, असे आव्हानच प्रशांत किशोर यांनी स्वीकारले आहे prashant kishor accepts challange from bjp

आधी नड्डा आणि काल – परवा अमित शहा यांच्या दौऱ्यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे बिगुल मोठ्याने वाजले आहे. एकीकडे भाजपने ममतांविरोधात आक्रमक तयारी केली असताना, ममतांचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दावा केला आहे की, “पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा पार करण्यासाठी संघर्ष करावा लागेल.” याचा अर्थच भाजपने दावा केल्याप्रमाणे २०० चा तिहेरी आकडा त्या पक्षाला गाठता येणार नाही.

प्रशांत किशोर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “मीडियातील काही चॅनल्सनी भाजपचा गरजेपेक्षा जास्तच प्रचार केला आहे. पण सत्य हे आहे की पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा पार करण्यासाठीच संघर्ष करावा लागेल. प्रशांत किशोर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी आपले ट्वीट सेव्ह करण्याचे आवाहन केले आहे. भाजपची कामगिरी यापेक्षा चांगली झाली तर रणनीतीकाराचे काम सोडेन, असे आव्हान त्यांनी स्वतःहून स्वीकारले आहे.

वास्तविक ममतांच्या पक्षाला लागलेल्या गळतीला पहिले त्यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि दुसरे प्रशांत किशोर जबाबदार आहेत. तृणमूळ काँग्रेस सोडून बाहेर पडलेल्या किंवा भाजपमध्ये गेलेल्या प्रत्येक नेत्याने हे सांगितले आहे.

prashant kishor accepts challange from bjp

सुरवातीला काही नेत्यांनी ममतांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे हे सांगण्याच्या प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकलेच नाही तेव्हा या नेत्यांनी बाहेर पडण्याचा मार्ग पत्करला आहे. त्यांनी खुलेपणाने प्रशांत किशोर यांचे नाव घ्यायला सुरवात केली आहे. त्यातूनच प्रशांत किशोर यांनी रणनीतीकाराचा झगा बाजूला करून आपण आक्रमक झाल्याचे दाखविले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण