विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात जनमताचा कौल महायुतीला असूनही केवळ भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी ऐक्याचे बळ दाखविणाऱ्या तीनही पक्षांनी स्थानिक निवडणूकीत मात्र वेगवेगळ्या चुली मांडत आहेत. तशा समोरून अधिकृत घोषणा कोणी केल्या नसल्या तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांची वाटचाल त्याच दिशेने चालू झाल्याचे स्पष्ट होते आहे. shivsena ncp congress to contest local elections on their own
राज्यात एकत्र सत्ता आणि खाली भांडायचे ही काँग्रेसी संस्कृती आहे. शिवसेना त्यात नव्याने सामील झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेपासून नुकत्याच जाहीर झालेल्या १४००० ग्रामपंचायतींच्या निवडणुकापर्यंतच्या सगळ्या निवडणूका हे तीनही पक्ष स्वबळावर लढविणार आहेत.
मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नव्यानेच नियुक्ती झालेल्या भाई जगताप यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना हे सांगितले. त्यामुळे मुंबईत शिवसेना – राष्ट्रवादी विरूध्द भाजप विरूध्द काँग्रेस असा सामना रंगण्याची चिन्हे ठळक होत आहेत.
ग्रामपंचायतीच्या निवडणूका तर राष्ट्रवादी कोणाला एबी फॉर्म देऊन लढवतच नाही, असे जयंत पाटील यांनी आधीच स्पष्ट केले आहे. तर काँग्रेस विचारांचे जास्तीत जास्त ग्रामपंचायत सदस्य निवडून आणू असे बाळासाहेब थोरात यांनी उघडपणे सांगितले आहे. त्यामुळे राज्यात फक्त भाजपला रोखण्यासाठी एकत्र आलेल्या तीनही पक्ष स्थानिक निवडणुकांमध्ये मात्र वेगवेगळ्या चुली मांडणार असल्याचे पुरेसे स्पष्ट झाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App