विशेष प्रतिनिधी
मुंबई – भाजप आमदार ॲड. आशीष शेलार यांना फोनवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. ओसामा समशेर खान (वय ४८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. One arrested for targeting Ashish Shelar
ओसामा खानने शेलार यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती. ओसामाचा एका जमिनीबाबत काही दिवसांपासून वाद सुरू आहे. याच प्रकरणात त्याच्या मुलावर खुनाच्या प्रयत्नाचा खटलाही दाखल आहे. या सर्व प्रकरणामागे आशीष शेलार यांचा हात असल्याचा संशय ओसामाला होता, त्यामुळे त्याने शेलार यांना धमकी दिल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
आशीष शेलार यांना धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. यापूर्वी २०२० मध्येही शेलार यांना धमकी देण्यात आली होती. त्यावेळी धमकी देणाऱ्याला पोलिसांनी मुंब्र्यातून अटक केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App