भाजप आमदार आशिष शेलार यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या ओसामा समशेर खानला अटक


वृत्तसंस्था

मुंबई : भाजपचे आमदार आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना त्यांच्या कुटुंबीयांसह ठार मारण्याची धमकी देणाऱ्या ओसामा समशेर खान (वय 48) या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी वांद्रे येथून अटक केली आहे. पोलिसांच्याच प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे.Mumbai Police Crime Branch says it has arrested a person, Osama Shamsher Khan

आमदार आशिष शेलार यांना कुटुंबियांसह ठार करण्याची धमकी देणारा फोन कॉल आला होता. याबाबत त्यांनी ताबडतोब पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती तसेच त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील या धमकी संदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र लिहिले होते.

त्यानंतर काही तासांमध्येच मुंबई पोलिसांनी ओसामा समशेर खान या व्यक्तीला आशिष शेलार आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार करण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात वांद्रे येथून अटक केली आहे.

Mumbai Police Crime Branch says it has arrested a person, Osama Shamsher Khan

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण