चित्रा वाघ मुख्यमंत्र्यांनी सरकार तालीबानांच्या हातात सोपवलयं का? राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जाताहेत.This government is working part time, Chitra Wagh strongly criticizes the state government
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजप नेते आमदार आशिष शेलार यांना एक अज्ञात व्यक्ती वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देत आहे.तसेच अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याची तक्रार आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना काल पत्र लिहून केली आहे.या प्रकरणी भाजपच्या चित्रा वाघ यांनी सरकरावर जोरदार टिका केली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, भाजपाचे जेष्ठ नेते आशिष शेलार यांना व त्यांच्या परीवाराला जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सरकार तालीबानांच्या हातात सोपवलयं का? राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जाताहेत.
भाजपाचे जेष्ठ नेते @ShelarAshish यांना व त्यांच्या परीवाराला विखारी भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी दिली गेलीये@CMOMaharashtraसरकार तालीबानांच्या हातात सोपवलयं का?एकीकडे मुख्यमंत्री हॉलीडेमुड मध्ये तर गृहमंत्री विकेंडमुड मधून बाहेर पडले नाहीतराज्यात सरकार नावाची गोष्ट उरलीये?? pic.twitter.com/lN3Jw5TInc — Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) January 8, 2022
भाजपाचे जेष्ठ नेते @ShelarAshish यांना व त्यांच्या परीवाराला विखारी भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी दिली गेलीये@CMOMaharashtraसरकार तालीबानांच्या हातात सोपवलयं का?एकीकडे मुख्यमंत्री हॉलीडेमुड मध्ये तर गृहमंत्री विकेंडमुड मधून बाहेर पडले नाहीतराज्यात सरकार नावाची गोष्ट उरलीये?? pic.twitter.com/lN3Jw5TInc
— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) January 8, 2022
पुढे चित्रा वाघ म्हणाल्या की , “एकीकडे मुख्यमंत्री हॉलीडे मुडमध्ये तर गृहमंत्री विकेंड मुडमधून बाहेर पडले नाहीत. हे सरकार पार्ट टाईम काम करतयं, राज्यात सरकार नावाची गोष्ट उरलीये का?” अशी बोचरी टीका चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App