वेळोवेळी वाहनचालकांना गाडी हळू चालव असे आवाहन करुनही अनेक वाहनचालक याकडे दुर्लक्ष करतात.6 airbags will now be mandatory in all cars in India; Nitin Gadkari took a big decision
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात रस्ते अपघाताच्या प्रमाणात सर्वाधिक वाढ होताना दिसून येत आहे. दरम्यान याच कारण म्हणजे जोराच्या स्पीडने गाडी चालवणं, तसेच खराब रस्ते यामुळे अपघातात मृत्यूचं प्रमाणही जास्त आहे.
तसेच जरी वेळोवेळी वाहनचालकांना गाडी हळू चालव असे आवाहन करुनही अनेक वाहनचालक याकडे दुर्लक्ष करतात.या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने सरकार लवकरच सर्व वाहनांमध्ये 6 एअरबॅग्स अनिवार्य करण्याचा आदेश देऊ शकतं.तसेच मध्यमवर्गीय लोक आपल्या बजेटनुसार लहान कार खरेदी करतात.त्यामुळे साधारणतः यांशन कारमध्ये दोन एअरबॅग्स असतात. परंतु ऑटोमेकर्स फक्त मोठ्या आणि महागड्या कारमध्येच जास्त एअरबॅग देतात.
त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लहान आणि स्वस्त कारमध्येही सहा एअरबॅग्स देण्याचं आवाहन कार उत्पादक कंपन्यांना केलं आहे.भारतीय ग्राहकांची सर्वाधिक पसंती ही त्यांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या म्हणजे लहान कारला असते.दरम्यान आता या लहान कारमध्ये देखील 6 एअरबॅग दिल्या गेल्या तर त्यांच्या किमतीत 8 ते 9 हजार रुपयांचा वाढ होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App