हा स्फोट एवढा मोठा होता की शेलार यांच्या घराच्या छताचे पत्रे उडून बाजूला पडले.स्फोटाच्या आवाजाने परीसरातील आजूबाजूचे लोक मदतीला धावले .Ahmednagar: Gas blast at a house in Belapur, 4 injured
विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर येथील एका राहत्या घरामध्ये गॅसचा स्फोट झाला.दरम्यान या स्फोटात ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना गुरुवारी सकाळी घडली आहे.स्फोटात झालेल्या जखमींना पुढील उपचारासाठी प्रवरानगर हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले आहे.
नेमकी घटना काय घडली
बेलापुर येथे गाढे गल्लीमध्ये शशिकांत शेलार हे भाड्याने राहतात.शेलार हे औषधाचा व्यवसाय करतात.गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता ज्योती शेलार यांनी शेगडी पेटविली असता अचानक स्फोट झाला, त्यावेळी शेलार यांच्या घरातील चौघे जण भाजून गंभीर जखमी झाले आहे.
हा स्फोट एवढा मोठा होता की शेलार यांच्या घराच्या छताचे पत्रे उडून बाजूला पडले.स्फोटाच्या आवाजाने परीसरातील आजूबाजूचे लोक मदतीला धावले .आगीमध्ये भाजलेल्या शेलार परिवाराला प्रवरानगर येथील रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर पुढील उपचार चालु आहे. सध्या जखमींची प्रकृती स्थिर आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App