विशेष प्रतिनिधी
सांगली – कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुन्हा कोविड रुग्णालयात रूपांतर केले जाणार आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी दिली. मिरजमधील हॉस्पिटलमध्ये सोमवारी दहा जानेवारी पासून नॉन कोविड ओपीडी, आय पी डी आणि सर्जरी बंद करण्यात येणार आहे.Miraj Medical College Converted to Covid Hospital
मात्र अपघात विभाग सुरु राहणार आहे, त्या रुग्णाच्यावर प्रथम उपचार केले जाणार आहेत. मात्र ते रुग्ण ऍडमिड करून घेतले जाणार नाहीत. तर सांगलीमधील शासकीय रुग्णालय हे पूर्णपणे नॉन कोव्हिड असल्याने, त्या ठिकाणी सांगली, मिरज किंव्हा अन्य सर्व भागातील रुग्णाच्यावर सर्व उपचार पूर्वी प्रमाणे केले जाणार आहेत, अस ही डॉ. सुधीर नणंदकर यांनी स्पष्ट केले आहे.
https://youtu.be/ZzPdrm2Q3AY
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App