विशेष प्रतिनिधी
वर्धा : वर्ध्यात दही कलाकंद खाल्याने ११ लोकांना अन्नबाधा झाली आहे. त्यांना रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले आहे.11 people suffer from food poisoning; Incidents in Wardha, hospital treatment of patients
वर्ध्याच्या नामांकित अंबिका हॉटेलमध्ये दही कलाकंद,दही समोसा खाल्याने ११ लोकांची प्रकृती खराब झाली आहे. काल सायंकाळी ६ वाजता दही कलाकंद खाल्याने लोकांना अन्नबाधा झाली. वर्ध्याच्या आनंद नगर,अशोक नगर येथील ही घटना आहे.
रुग्णाना वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. एक रुग्ण सावंगी येथे उपचारासाठी हलविल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली. वर्धा शहराचे पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी रुग्णालयाला भेट दिली.
दरम्यान, अन्नबाधा झालेल्यामध्ये पाच वर्षाच्या मुलांचाही समावेश असून २महिलांनाही अन्नबाधा झाल्याची माहिती पुढे आली आहे. अन्नबाधा झालेल्याना उलटी,हगवण यांचा मोठा त्रास होत आहे. ८ रुग्णांवर वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App