धनगरांच्या अभिमान, स्वाभिमान आणि भावनांसोबत हे सरकार खेळत आहे. या गोष्टीमुळे मंत्र्यांना गावागावत फिरणेही कठीण होईल. विश्वासघाताने सत्तेत आलेल्या या सरकारला आम्ही दादागिरी करु असे वाटत असेल, मात्र ती दादागिरी आम्ही मोडीत काढू, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : धनगरांचा अभिमान, स्वाभिमान आणि भावनांसोबत हे सरकार खेळत आहे. या गोष्टीमुळे मंत्र्यांना गावागावत फिरणेही कठीण होईल. विश्वासघाताने सत्तेत आलेल्या या सरकारला आम्ही दादागिरी करु असे वाटत असेल, मात्र ती दादागिरी आम्ही मोडीत काढू, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
Gopichand Padalkar latest news
हिवाळी अधिवेशानात धनगर समाजाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पडळकर यांनी खास धनगरी वेष परिधान करुन आणि ढोल वाजवत आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
पडळकर म्हणाले की हे सरकार झोपले आहे आणि त्यासाठी धनगर समाजाचे श्रद्धास्थान असणारा ढोल वाजवून जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या पाठीमागे 16 मागण्या असणारा बोर्ड लिहिला होता तो मोडला आणि ढोल वाजवण्यापासून रोखण्यात आले आहे. आमची ही लोककला आहे आणि कारण नसताना पोलिसांनी सरकारच्या सूचनेनुसार रोखले आहे. मी सरकारचा निषेध करतो.
पडळकर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर एकही बैठक घेण्यात आलेली नाही. विरोधात असताना महाविकास आघाडी सरकारमधीलच काही नेते पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडी, हातात काठी घेऊन धनगर आरक्षणावर प्रश्न विचारत होते. मग आता तेच नेते गप्प का आहेत, असा प्रश्नही त्यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App