खलिस्थानवाद्यांकडून निधी मिळत असल्यानेच कॅनडाच्या पंतप्रधानांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, 22 माजी राजदूतांनी पत्र लिहून केली पोलखोल


भारताच्या अंतर्गत प्रश्नांत नाक खुपसून कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केले. यावरून त्यांच्यावर जगभरातून टीका होत असताना भारताच्या २२ माजी राजदूतांनी ट्रूडो यांची पोलखोल केली आहे. खलिस्थानवाद्यांकडून लिबरल पार्टीला मोठ्या प्रमाणावर निधी मिळत असल्यानेच ट्रूडो यांनी भारताच्या अंतर्गत मुद्यावर नाक खुपसले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताच्या अंतर्गत प्रश्नांत नाक खुपसून कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केले. यावरून त्यांच्यावर जगभरातून टीका होत असताना भारताच्या २२ माजी राजदूतांनी ट्रूडो यांची पोलखोल केली आहे.

Canadian PM backs farmers’ movement over funding from Khalistan activists

खलिस्थानवाद्यांकडून जस्टीन यांच्या लिबरल पार्टीला मोठ्या प्रमाणावर निधी मिळत असल्यानेच त्यांना पंजाबी शेतकऱ्यांचा पुळका आला असल्याचे या राजदुतांनी म्हटले आहे. देशातील २२ माजी राजदूतांनी याबाबत खुले पत्र लिहिले आहे. यामध्ये विष्णु प्रकाश, अजय स्वरुप, जी. एस. अय्यर आणि एस. के. माथूर यांच्यासारख्या ज्येष्ठ राजदूतांचाही समावेश आहे.

ट्रूडो यांचे वक्तव्य वास्तवाला धरून नसून अपस्तुत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे केवळ मतांसाठी करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना भडकाविण्यासाठीच हे केले आहे. कॅनडातील लिबरल पार्टीच्या शिख मतदारांचा अनुनय करण्यासाठी त्यांनी भारताच्या अंतर्गत प्रश्नात नाक खुपसले आहे. कॅनडामधील शिख युवकांना कट्टरतावादाकडे जाण्यास ते प्रवृत्त करत आहे. परंतु, छोट्याशा राजकीय खेळीसाठी हे करणे योग्य नाही. कॅनडातील बहुतांश गुरूद्वारांवर खलिस्थानवाद्यांनी नियंत्रण मिळविले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसा जमा झाला आहे. हा पैसा लिबरल पार्टीच्या निवडणूक प्रचारासाठी वापरला जातो.

कॅनडाने पाठिंबा दिल्याने आंदोलनातील काही जण हुरळून गेले आहेत. त्यामुळे आंदोलनावर ते ठाम आहेत. मात्र, कॅनडाच्या पंतप्रधानांकडून केलेल्या या वक्तव्याचा भारत आणि कॅनडातील द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर जगातही त्यांना शरमेने मान खाली घालावी लागली आहे.

Canadian PM backs farmers’ movement over funding from Khalistan activists

ट्रूडो यांना सल्ला देताना माजी राजदूतांनी म्हटले आहे की कॅनडाने दुसऱ्या देशाच्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ केल्यास त्यांच्यावरही ही वेळ येऊ शकते, हे लक्षात ठेवायला हवे. भारत कॅनडाशी चांगले संंबध ठेवू इच्छिते. परंतु, हे एकतर्फी होऊ शकत नाही. भारताच्या राष्ट्रीय हितास बाधा पोहोचत असेल तर हे होऊ शकणार नाही. त्यामुळे आता कॅनडातील जनतेनेच निर्णय घ्यायला हवा.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात