केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आज जालन्यात नांदेड-हडपसर-पुणे एक्स्प्रेसचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आणि जिल्ह्यातील पहिल्या किसान रेल्वेचाही शुभारंभ करण्यात आला. या किसान रेल्वेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्याचा 350 टन कांदा यावेळी आसाममध्ये पाठवण्यात आला. Union Minister of State for Railways Raosaheb Danve Gives green flag, 350 tonnes of onion to Assam
विशेष प्रतिनिधी
जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आज जालन्यात नांदेड-हडपसर-पुणे एक्स्प्रेसचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आणि जिल्ह्यातील पहिल्या किसान रेल्वेचाही शुभारंभ करण्यात आला. या किसान रेल्वेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्याचा 350 टन कांदा यावेळी आसाममध्ये पाठवण्यात आला.
कमी वाहतूक खर्च आणि कमी वेळेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता शेतीमाल बाहेरील राज्यात पाठवता येणार आहे. त्यामुळे किसान रेल शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलीय. दरम्यान 1 हजार कोटी रुपये खर्चून औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गाच दुहेरीकरण करणार असून या दुहेरी मार्गाच्या सर्व्हेक्षणाला सुरुवात झाल्याची माहितीदेखील दानवे यांनी दिली आहे.
दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद ते नांदेड मार्गाचे दुहेरीकरण केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. जालना-खामगाव या रेल्वेमार्गासाठी अंतिम सर्व्ह करण्याचं काम सुरू आहे, असंही दानवे यांनी स्पष्ट केलं. तर मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन सर्व्हेक्षणाचं काम सुरू असून औरंगाबादमध्ये कार्यालयाचं काम सुरू करण्यात आलं असून आवश्यक जागा अधिग्रहण करण्याबाबत राज्य सरकारशी चर्चा केली जाईल, असंही दानवे यावेळी म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App