पवारांच्या राजकारणाची ही तर सुरवात, पाटलांचा नवा दावा
विशेष प्रतिनिधी
मुंबई – ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आनंदाच्या भरत्याने सर्व मर्यादा ओलांडल्या. बीडमध्ये स्टेजवर तरूणांची केक खायला जशी झुंबड उडाली तशी पवारांवर स्तुतिसुमने उधळायलाही नेत्यांची झुंबड उडाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पवारांना फुले – शाहू – आंबेडकरांच्या पंक्तीत नेऊन बसविले. jayant patil compares sharad pawar with phule – shahu – ambedkar
मात्र, हे सगळे काँग्रेस संस्कृतीनुसारच घडले. १९७५ मध्ये देवकांत बरूआ नावाच्या काँग्रेस अध्यक्षांनी इंदिरा इज इंडिया असे संबोधून इंदिरा गांधींना भारतमाता केले होते. जयंत पाटलांनी पवारांना फुले – शाहू – आंबेडकरांच्या रांगेत नेऊन बसविले.
जयंत पाटील यांनी ट्विटवर आपल्या भावना मोकळ्या केल्यात. हा महाराष्ट्र ज्यांच्यामुळे घडला, वाढला, समृद्ध झाला, सुजलाम- सुफलाम झाला अशा निवडक लोकांची नावे काढली तर त्यात अर्थात छत्रपती शिवाजी महाराज येतात. फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण यांचे स्थान आहे. आज त्या पंगतीत आपले नेते शरद पवार साहेबसुद्धा विराजमान झाले आहेत.
२०१९ च्या निवडणुकीत आपण सर्वांनी शरद पवार नावाचा करिष्मा बघितला आहे. स्वतःला देशाचे मालक समजणाऱ्या लोकांचा “बाप आला” असे म्हणत लोकांनी साहेबांचे राज्यभर स्वागत केले, त्यांचे नेतृत्व स्वीकारले. ‘शरद पवार जी कि राजनीती का दौर अब शुरू हुआ है’ हे विरोधकांनी जाणावे, असा इशाराही यावेळी जयंत पाटील यांनी दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App