विशेष प्रतिनिधी
अमृतसर : कृषि कायद्याविरोधात झालेल्या शेतकरी आंदोलनाचा चेहरा असलेला युवक शिख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे उघड झाले आहे. सार्वमत २०२० चा प्रचार केल्याच्या आरोपावरून त्याला आई आणि मित्रासह अटक करण्यातआली आहे.Face of farmers’ agitation is Khalistan supporter
शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान निघालेल्या मोर्चात हरियाणामध्ये पोलीसांनी आंदोलकांवर पाण्याचे फवारे मारले होते. यावेळी पोलीसांचा सामना करत असलेल्या जगमीत सिंग याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. शेतकरी आंदोलनाचा चेहरा म्हणून जगमीत सिंग पुढे आला होता.
शेतकरी आंदोलनात खलिस्थानवादी समर्थक घुसल्याचा आरोप तेव्हापासूनच करण्यात आला होता. जगमीत सिंग याच्या अटकेवरून हे स्पष्ट झाले आहे. पतियाळा पोलिसांनी 28 वर्षीय जगमीत सिंग, त्याची आई 50 वर्षीय जसवीर कौर आणि त्याचा मित्र 23 वर्षीय रविंदर सिंग यांना अटक केली आहे. सोशल मीडियावर शिखांना सार्वमतासाठी मतदान करण्याचे आवाहन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
जगमीत आणि त्याची आई मूळचे गुरुदासपूरमधील दुगार्पूर गावचे आहेत. मात्र, सध्या ते बाणूरच्या हाऊसफेड सोसायटीत राहत आहेत. त्याचा मित्र रविंदर हा फतेहगढ साहिबमधील मंडी गोबिंदगडमधील जसदा गावचा आहे. हे तिघेही काही काळ सार्वमतासाठी प्रचार करत आहेत. या तिघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रचारासाठी त्यांना परदेशी निधी मिळाला होता का, याचा तपास सुरू आहे.
माता गुजरी आणि गुरु गोविंद सिंग यांच्या पुत्रांच्या हौतात्म्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लंगरदरम्यान राजपुरा येथे सार्वमतासाठी प्रचार केल्याचा आरोप या तिघांवर आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ अ, ५०५ (२), ५०५ (३), १२०-बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजपुराचे डीएसपी जी.एस बैंस म्हणाले, जगमीत याचा व्हिडिओ गेल्या वर्षी शेतकरी आंदोलनादरम्यान व्हायरल झाला होता. तिघेही आरोपी बंदी घातलेल्या शिख्स फॉर जस्टिसच्या संगनमताने सार्वमतासाठी प्रचार करत होते आणि जनतेला सार्वमतासाठी ऑनलाइन मतदान करण्यास प्रवृत्त करत होते.
जसवीर हा प्रमुख प्रचारक होते. सर्व आरोपींची बँक खाती तपासली जात असून त्यांना परदेशी निधी मिळाला आहे का, याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी तथाकथित सार्वमत 2020 साठी 692 फॉर्म आणि पॅम्पलेट, प्लास्टिक प्लेट्स, स्प्रे बाटल्या, पेन आणि इतर प्रचार साहित्य जप्त केले आहे. जसवीरचा मेहुणा मनजीत सिंग हा बब्बर खालसा इंटरनॅशनल ग्रुपचा कमांडर आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App