कोरोनानंतर शेतकरी आंदोलनाचा फटका, व्यापार उद्योगाला एक लाख कोटींचा फटका

गेल्या नऊ महिन्यांत कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. त्याच्यातून भारत सावरत असताना शेतकरी आंदोलनामुळे मोठा आर्थिक फटका बसल्याचे दिसून आले आहे. गेल्या ७३ दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे देशातील व्यापार उद्योगाला सुमारे एक लाख कोटींचा फटका बसला आहे. After Corona, the farmers’ movement hit, the trade industry hit one lakh crore


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गेल्या नऊ महिन्यांत कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. त्याच्यातून भारत सावरत असताना शेतकरी आंदोलनामुळे मोठा आर्थिक फटका बसल्याचे दिसून आले आहे. गेल्या ७३ दिवसांपासून दिल्लीत सुरू शेतकरी आंदोलनामुळे देशातील व्यापार उद्योगाला सुमारे एक लाख कोटींचा फटका बसला आहे.

शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमा अडविल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत ३० हजार कोटींचा माल थांबला असून इतर राज्यांतून दिल्लीत येणारा ७० हजार कोटी रुपये किमतीचा मालही अडकला आहे, अशी माहिती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी दिली.नागपूर येथे कॅटची राष्ट्रीय प्रशासकीय परिषद झाली. या वेळी बोलताना खंडेलवाल म्हणाले की, कृषी कायदा हा शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांच्याही हिताचा आहे. या आंदोलनामुळे देशातील व्यापारी वर्गाला आतापर्यंत एक लाख कोटीचे नुकसान सहन करावे लागले. आंदोलन अधिक काळ चालले तर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीतून इतर राज्यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह उद्योगाला लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा केला जातो. ३० हजार कोटींचा माल दिल्लीत अडकून पडला आहे.

खंडेलवाल म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमाफीसोबतच अनेक प्रकारचे अनुदान मिळत असते. तसेच केंद्र सरकारकडून उद्योजकांनाही वेळोवेळी मोठी मदत केली जाते. मात्र व्यापाऱ्यांना सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. देशातील सव्वा कोटी व्यापारी अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसोबत लढत आहेत. या दोन्ही कंपन्या देशातील नागरिकांना लुटत आहेत. या संदर्भात आम्ही न्यायालयात लढा देत असून त्यासाठी एक समिती देखील गठित करण्यात आली आहे.

After Corona, the farmers’ movement hit, the trade industry hit one lakh crore

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*