परीक्षांमध्ये चोरांचा बाजार, आरोग्य विभागाच्या गट क परीक्षेचे पेपरही फोडले, न्यासा कंपनीचे नाव समोर

राज्यातील सर्वच परीक्षांमध्ये चोरांचा बाजार सुरू असल्याचे उघड झाले आहे. राज्यात आरोग्य विभागाच्या गट ड, म्हाडा, टीईटी आदी पेपरफुटीची प्रकरणे ताजी असताना, पुन्हा एका मोठ्या परीक्षेत घोळ झाला आहे. नव्या प्रकरणात न्यासा नावाच्या एजन्सीचे नाव समोर आले आहे. The Group C exam papers of the health department were also torn, in front of the name of the trust company


विशेष प्रतिनिधी

पुणे – राज्यातील सर्वच परीक्षांमध्ये चोरांचा बाजार सुरू असल्याचे उघड झाले आहे. राज्यात आरोग्य विभागाच्या गट ड, म्हाडा, टीईटी आदी पेपरफुटीची प्रकरणे ताजी असताना, पुन्हा एका मोठ्या परीक्षेत घोळ झाला आहे. नव्या प्रकरणात न्यासा नावाच्या एजन्सीचे नाव समोर आले आहे.

याप्रकरणी पुणे पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणी तपास सुरू असताना निशीद गायकवाड (रा अमरावती) याने काही लोकांच्या मदतीने आरोग्य विभागाचा गट क परीक्षेचे पेपर फोडून एजंटद्वारे परिक्षेपुर्वी पैसे घेतल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसानी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.



महेश बोटले, प्रशांत बडगिरे, डॉ. संदीप जोगदंड, राजेंद्र सानप, निशीद रामहरी गायकवाड, राहुल धनराज लिंघोट अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील निशीद गायकवाड आणि राहुल लिंघोट या दोघांना अटक करण्यात आली आहे.

यापूर्वी आरोग्य भरती ड चा पेपर फुटला होता. ड मधील पेपरफुटीतील आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. पेपर फुटीची ही सर्व प्रकरणे एकमेकांत गुंतलेली आहेत. आतापर्यंत एकूण 28 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

The Group C exam papers of the health department were also torn, in front of the name of the trust company

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात