विशेष प्रतिनिधी
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कन्या विवाह या सामूहिक विवाह योजनेद्वारे आता विधावा स्त्रियांनी देखील पुनर्विवाह केल्यानंतर अनुदान मिळणार आहे. ज्या मुलींचे 18 वर्ष पूर्ण झाले आहे आणि ज्या मुलांचे वय 21 एकवीस वर्ष पूर्ण झाले आहे. हे सर्व जण ह्या योजनेंतर्गत लाभ घेऊ शकतात.
Widow Remarriage: In Uttar Pradesh from 2022, widows who want to get married again, will also be able to avail the benefits of Mukhyamantri Kanya Vivah Yojana
विधवा स्त्रियांना जर पुनर्विवाह करण्याची इच्छा असेल तर त्या स्त्रियांना देखील आता 2022 पासून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्यांचा विवाह ठरला आहे, ते विवाहाच्या आधी तीन महिने आणि विवाहानंतरचे तीन महिन्यांनंतर हे अनुदान मिळण्यासाठी ऑनलाइन अर्जद्वारे अप्लाय करू शकतात.
अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक वर्ग, दारिद्रय़ रेषेखालील सर्व लोकांना या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ अमरनाथ यांनी याबाबत सांगताना म्हटले आहे की, सामुहिक विवाहाची तयारी लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. 2022 च्या एप्रिल किंवा जुलैमध्ये सार्वजनिक विवाह आयोजित केले जाणार आहेत.
पुनर्विवाहानंतरही विधवा पत्नीचा पहिल्या पतीच्या संपत्तीवर अधिकार , उच्च न्यायालयाचा निकाल
या योजनेअंतर्गत लाभार्थींनी जर स्वतः हा वैयक्तिक सोहळा साजरा केला, तर त्यांना 20000 रुपये अनुदान मिळणार आहे. जर सामुहिक विवाह सोहळ्यांमध्ये भाग घेतला तर त्यांना 51000 रुपये मिळणार आहेत. या 51000 पैकी 35000 रुपये मुलीच्या बँक खात्यामध्ये जातील. तर 10000 रुपये हे मुलीच्या सार्वजनिक विवाह सोहळ्यातील लग्नाच्या खर्चासाठी खर्च केले जातील.
लॉक डाऊनच्या आधी झालेल्या सामुदायिक विवाह सोहळा मधून 1790 जणांनी या योजनेचा लाभ घेतला होता. पैकी दारिद्रयरेषेखालील फक्त 99 मुलींनी या योजनेचा लाभ घेतला होता.
दारिद्र्य रेषेखालील उत्पन्नाच्या मर्यादा खालीलप्रमाणे आहेत.
खेडेगावात राहणाऱ्या लोकांचे वार्षिक उत्पन्न जर 46080 रुपयांच्या खाली असेल आणि शहरी भागात राहणाऱ्या लोकांचे उत्पन्न जर 56460 च्या खाली असेल तर या लोकांना लोक योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची आवश्यकता आहे. खालील वेबसाईटवर क्लिक केल्यास अर्ज उपलब्ध होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
http://WWW.shadianudan.upsdc.gov.in
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App