प्रतिनिधी
मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यात येत्या 27 ते 29 डिसेंबरपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रविवारपासून वायव्य भारतावर व 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्याने महाराष्ट्रात 28-29 डिसेंबरला काही जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची तसेच काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डिसेंबरची सुरुवात देखील पावसाने होती. शेवटही पावसाने होतो आहे. IMD predicts unseasonal rains in North Maharashtra, Marathwada and vidharbha
उद्या 26 डिसेंबरपासून वायव्य भारतावर व 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता. राज्यात खाली दर्शविल्या प्रमाणे 28-29 डिसेंबरला काही जिल्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता व काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता.
उद्या 26 डिसेंबरपासून वायव्य भारतावर व 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता. राज्यात खाली दर्शविल्या प्रमाणे 28-29 डिसेंबरलाकाही जिल्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता व काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता.-IMDPl see IMD Updates. pic.twitter.com/Y3M0zBMY4c — K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 25, 2021
उद्या 26 डिसेंबरपासून वायव्य भारतावर व 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता. राज्यात खाली दर्शविल्या प्रमाणे 28-29 डिसेंबरलाकाही जिल्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता व काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता.-IMDPl see IMD Updates. pic.twitter.com/Y3M0zBMY4c
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 25, 2021
हवामान विभागाने 28 आणि 29 डिसेंबरसाठी यलो अॅलर्ट जारी केले आहेत. राज्यात 28 डिसेंबरला औरंगाबाद, जालना,जळगाव, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह,हलका ते मध्यम पाऊस व वारा शक्यता आहे. 27 ला विर्दभात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
– 29 ला विदर्भ मराठवाड्यात पाऊस
नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App