नाशिक : महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांमध्ये 1076 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भर विधिमंडळात दिल्यानंतर काही काळ सदस्यांमध्ये खळबळ माजली. पण आज दिवसभरात चर्चा मात्र मांजर – कोंबड्याचा कॉकटेल फोटो, मंत्र्यांचा पगार आणि पेंग्वीनवरचा खर्च आणि कालचे विधिमंडळाच्या पायर्यांवरील म्याऊं – म्याऊं याचीच होती. हे महाराष्ट्र विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे. “अतिशय गंभीर” वातावरणात वर उल्लेख केलेल्या विषयांची चर्चा सुरू आहे…!! 1076 farmer suicides in 5 months in Maharashtra
1076 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली विजय वडेट्टीवार यांनी दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे पवार सरकारवर विधिमंडळात जोरदार टीकास्त्र सोडले. आमचे सरकार असताना तुम्ही बांधावर जाऊन मोर्चा काढण्याच्या गप्पा तुमचे नेते मारत होते. पण प्रत्यक्षात अवकाळी पावसाने दोनदा नव्हे तर तीनदा शेतकरी अडचणीत आला तेव्हा तुमच्या सरकारने मदतीच्या नावाने नुसता ठणाणा केला. “आलं अंगावर की ढकला केंद्रावर…!!”, अशी तुमची वृत्ती आहे, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.
पण हा विषय नंतर बाजूला पडला. नंतर राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून कोंबडा – मांजरीचा कॉकटेल फोटो शेअर केला आणि त्याला वरती कॅप्शन दिले पहचान कौन? काल विधिमंडळाच्या पायर्यांवर भाजपचे सर्व आमदार आंदोलन करत असताना तिथून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जात होते. त्यावेळी त्यांना बघून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी म्याऊं – म्याऊंचा आवाज काढला
. तो विषय आदित्य ठाकरे यांनी सोडूनही दिला होता. किंबहुना दुर्लक्ष करून त्या विषयाला आदित्य ठाकरे यांनी राजकीय चातुर्याने बगल दिली होती. परंतु नवाब मलिक यांनी आज दुपारी मांजर – कोंबडा असा कॉकटेल फोटो शेअर करून तो विषय पुन्हा उकरून काढला.
नवाब मलिक यांनी वरवर पाहता नवाब मलिक यांनी नितेश राणे यांना डिवचले असले तरी त्यांना आदित्य ठाकरेंवरच्या म्याऊं – म्याऊं टीकेला पुन्हा हवा द्यायचे होते हे स्पष्ट झाले.
त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी परीक्षांचा विषय काढला. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्याच्या नावे एक गोष्ट सांगितली. पदवी असून मी शंभर रुपये रोजाने काम करतो. पण मरून जाऊन पुढचा जन्म राणीच्या बागेत पेंग्विनचा घ्यावा, असे मला वाटते. कारण माझ्यापेक्षा पपेंग्विनवर जादा खर्च होतो, असे मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्याच्या नावे सांगितले.
त्यावेळी पेंग्विनवर नेमका किती खर्च होतो याची आकडेवारी काढल्यावर दरमहा पेंग्विनवर 15 लाख रुपये खर्च होतो, असे निदर्शनास आले. त्यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना उद्देशून मुनगंटीवार म्हणाले, याचा अर्थ गृहमंत्र्यांच्या पगारापेक्षा पेंग्विनवरचा खर्च जास्त म्हणजे पेंग्विन मंत्र्यांपेक्षा व्हीआयपी आहे.
त्यामुळे आज दिवसभर शेतकरी आत्महत्यांचा विषय काहीवेळ विधिमंडळात चर्चेला आला. पण दिवसभर मात्र मंत्र्यांच्या पगार, मांजर – कोंबड्याचा काॅकटेल फोटो आणि पेंग्विनवरचा खर्च हे विषय महाराष्ट्राच्या विधिमंडळात आणि विधिमंडळ परिसरात चर्चेचा विषय होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App