महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या वाढीव संकटात पुन्हा निर्बंध, आज नवी नियमावली; मुख्यमंत्री – टास्क फोर्स बैठकीत निर्णय


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात वाढलेल्या कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले आहेत. राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्याचे काल निश्चित केले आहे. त्यानुसार आज, शुक्रवारपासून नवे निर्बंध तसेच नियमावली जाहीर होणार आहेत. Covid 19 task force recommendes new rules and regulations in Maharashtra

राज्यातल्या कोरोना रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा झाली. आज 24 रोजी नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले आहे.

काल झालेल्या बैठकीत इतर राज्यांनी लावलेल्या निर्बंधांवर तसेच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा
झाली. बैठकीस मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ अजित देसाई, डॉ राहुल पंडित आदी उपस्थित होते.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यांना निर्देश
  • ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका पाहून केंद्राने राज्यांना काही आदेश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांशी सवांद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना महत्वाच्या सूचना दिल्या.
  •  रात्रीची संचारबंदी लावा. गर्दीच्या कार्यक्रमांना, ठिकाणांवर निर्बंध आणावेत.
  •  सण, उत्सव लक्षात घेऊन रुग्ण वाढले असतील तर कंटेन्मेंट झोन, बफर झोन तयार करा.
  • टेस्टिंग आणि संपर्कात आलेल्यांवर लक्ष ठेवा. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार डोअर टु डोअर जाऊन रुग्णांचा शोध घ्यावा.
  •  हॉस्पिटलमध्ये बेड, आरोग्य उपकरणे अँम्बुलन्स वाढवा, ऑक्सिजनचा बफर स्टॉक वनबा, 30 दिवसांचा औषधांचा साठा करणे. लसीकरण लवकर पूर्ण करणे.

Covid 19 task force recommendes new rules and regulations in Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात