प्रतिनिधी
मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी काल सकाळी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरे यांना बघून म्याऊं – म्याऊं केले. त्यावर आदित्य ठाकरे यांनी दुर्लक्ष करून ते विधिमंडळात निघून गेले. पण 24 तास उलटून गेल्यानंतर शिवसेनेने नव्हे, तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवर नितेश राणे यांना प्रत्युत्तर दिले आहे. Nawab Malik’s “cocktail” reply
पैहचान कौन ? pic.twitter.com/zNCdvKazH8 — Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 24, 2021
पैहचान कौन ? pic.twitter.com/zNCdvKazH8
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 24, 2021
कोंबड्याच्या फोटोवर मांजरीचा चेहरा चिकटवून “पहचान कौन?” अशी टॅगलाईन नवाब मलिक यांनी देऊन नितेश राणे यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केल्याचे वरवर दिसते.
पण शिवसेनेने आणि आदित्य ठाकरे यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेला नितेश राणे यांचा म्याऊं – म्याऊंचा विषय नवाब मलिक यांच्या कोंबडा मांजराच्या कॉकटेल फोटोमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना नितेश राणे यांना ङिवचायचे आहे? की शिवसेनेने दुर्लक्ष करून बाजूला टाकलेला विषय पुन्हा उकरून काढायचा आहे? आणि आदित्य ठाकरे यांची परस्पर पुन्हा एकदा खिल्ली उडवायची आहे?? याची चर्चा मुंबईतल्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App